loader image
[ays_poll id=7]

मनमाड भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा कार्य उपक्रमांचे आयोजन

Sep 17, 2022


भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे ७२ व्या जन्मदिना निमित्ताने मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे सेवा पंधरवडा शुभारंभ विविध सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे ७२ व्या जन्मदिना निमित्ताने मनमाड शहर भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांचे नेतृत्वा मध्ये मनमाड शहर भाजपा मंडल च्या वतीने विविध सेवा उपक्रमा चे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमान मध्ये भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सर्व प्रथम मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्व रूग्णांना फळे,बिस्किटे,पाणी बाटली असे साहित्य वाटप करण्यात आले त्यानंतर याच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात भा ज युवा मोर्चा चे नासिक जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे यांचे संयोजना तून आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तदनंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बोर्डिग मधील सर्व विद्यार्थ्यांना वही, कंपास पेटी असे शालेय उपयोगी वस्तू चे वाटप करण्यात आले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून आज भाजपा तर्फे सर्व देशभरात सेवा कार्यक्रमान चे आयोजन केले असून सेवा ही संघटन ही संकल्पना भाजपा वास्तविक पणे राबवत आहे असे जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे यांनी या प्रसंगी सांगितले तर हा आज सुरू झालेल्या या सेवा पंधरवडा अंतर्गत ०२ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यन्त मनमाड शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान , सह विविध लोकल्याणकारी सेवा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे भाजपा शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमांचे सूत्र संचालन भाजपा अल्पसंख्यक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी, व शहर सरचिटणीस दीपक गोयल यांनी केले या कार्यक्रमास भाजपा नासिक जिल्हा आर्थिक सेल चे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत,कामगार संघटनेचे चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजूभैया पवार,भाजपा मनमाड शहर सरचिटणीस एकनाथ बोडखे, नितिन परदेशी,भाजपा मनमाड शहर महिला मोर्चा अध्यक्ष सौ सोनीताई पवार,भाजपा शहर कोष्याध्यश आनंद काकडे,भाजपा शहर उपाध्यक्ष बुधन बाबा शेख,भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुरहांन शेख,शहर अध्यक्ष दीपक पगारे भाजपा जिल्हा कार्य सदस्य महेंद्र गायकवाड, भाजपा शहर चिटणीस मकरंद कुलकर्णी नारायण जगताप , सूमेर मिसर भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा चिटणीस गौरव ढोले,केतन देवरे,शहर अध्यक्ष गोविंद सानप, महिला मोर्चा सरचिटणीस अक्षदाताई पगारे,सौ जयश्रीताई कुंभार,भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस अकबर शहा जेष्ठ नीलकंठ त्रिभुवन, धीरज भाबड भाजपा अनुसूचित मोर्चा शहर अध्यक्ष आशिष चावरीया, भाजपा सहकार आघाडी शहर अध्यक्ष किरण उगलमुगले,सचिन मोरे,संतोष पगारे आदी भाजपा पदाधिकाऱ्यांन सह शहरातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख , बूथ प्रमुख, भाजपा कार्यकर्ते व हितचिंतक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमांचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, नितीन पांडे, आनंद काकडे, सुमेर मिसर, दीपक गोयल यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.