loader image
[ays_poll id=7]

कॅन्सर जनजागृती तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

Sep 18, 2022


.मनमाड – (अफरोज अत्तार) येथील ईदगाह आयु.डी.पी. विभागातील डॉ. राठी हॉस्पिटल येथे लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राईड तसेच मानवता कॅन्सर हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व उपचार शिबिर संपन्न झाले. यात जवळपास 100 च्या वर स्त्रियांची तपासणी, रक्त तपासणी पँप स्नियर टेस्ट इत्यादी तपासण्या मोफत करून वैद्यकीय सल्ला देण्यात आला.
उद्घाटन लायन्सचे प्रांतपाल एम जे एफ लायन राजेश जी कोठावदे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी लायन्स क्लब मनमाड सिटीच्या अध्यक्ष लायन वैशाली वाणी, सेक्रेटरी रेखाताई येणारे,खजिनदार सुचिता खताळ प्रोजेक्ट चेअर पर्सन डॉक्टर प्रताप गुजराथी, डॉक्टर निलेश राठी,डॉक्टर अर्चना राठी ॲड.शशिकांत व्यवहारे, डॉक्टर जालिंदर इंगळे, भारत जगताप, राजेंद्र माळी, हर्षद गद्रे सर, गणेश हडपे, सुशील संकलेचा, नितीन पवार, वैभव काकडे,पुष्पाताई मतकर, स्नेहल भागवत, संगीता कदम, मनीषा अग्रवाल, सौ डगळे, लायन अरुण दराडे, सौ विजया गुजराथी, सीमा कुलकर्णी आदी सदस्य उपस्थित होते.प्रतिष्ठित डॉक्टर सुनील बागरेचा, डॉक्टर दिलीप मुथा, माजी नगरसेवक दिलीप तेजवानी उपस्थित होते. व्यासपीठावर लायन्स क्लब मनमाड प्राईडचे अध्यक्ष दिनेश मुनोत, सेक्रेटरी सीए श्रेणिक बरडिया, खजिनदार डॉक्टर आकाश जैन व मानवता हॉस्पिटलच्या मंजुषा मॅडम व डॉक्टर रिजवाना मॅडम उपस्थित होते.

सूत्रसंचालन लायन विवेक बरडीया यांनी केले. प्राईडचे डॉक्टर मोहित लोढा, डॉक्टर ऋता लोढा,डॉक्टर सोनल भंडारी, मंगलेश बाकलीवाल, डॉक्टर रूपाली जैन, सौ मुनोत व सर्व लायन्स सभासद हजर होते प्रमुख पाहुण्यांनी दोन्ही क्लबच्या सेवा कार्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले याप्रसंगी डॉक्टर गुजराथी लिखित कॅन्सर जनजागृती पर लेखमालेचे अनावरण करण्यात आले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.