Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा

Sep 18, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे आज दि.16 सप्टेंबर 2022 रोजी कार्यक्रमाचे आयोजन करून जागतिक ओझोन दिन महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.याप्रसंगी मॅंनग्रौ फाउंडेशन, मुंंबई (Mangrove Foundation, Mumbai) येथील पर्यावरणप्रेमी व कासवमित्र प्रा. मोहन दत्तात्रय उपाध्ये हे प्रमुख वक्ते होते. आपल्या मनोगतातून त्यांंनी पृथ्वीवरील परिसंस्था व जैवविविधता यामध्ये असणारे कासवांचे महत्त्व हे चित्रफितीद्वारे सादर केले. कासवांची जीवनमान शैली, प्रज्योत्पादन क्षमता, कासवांचा अधिवास याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले त्याचबरोबर पर्यावरणामध्ये कासवांचे असणारी महत्त्वाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. अरुण पाटील सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून जागतिक ओझोन दिन का साजरा केला जातो. तसेच ओझोन थराचे महत्त्व, मानवाची पर्यावरणातील महत्त्वाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागाचे प्रा. डॉ. गणेश गांगुर्डे यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. रोहित शिंदे, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भूगोल विभाग प्रमुख प्रा. सुरेश पगार, प्रा. देविदास सोनवणे व प्रा. कॅप्टन प्रकाश बर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील कु. ज्ञानेश्वरी चंद्रात्रे या विद्यार्थिनी केले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय द्वितीय वर्ष कला या वर्गातील भूगोल विभागाची विद्यार्थ्यांनी कु. गायत्री शिंदे या विद्यार्थिनींनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील कु. साक्षी सांगळे या विद्यार्थिनीने केले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]