loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १९ सप्टेंबर २०२२ – सोमवार

Sep 19, 2022


मेष – आज आपल्याला नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्याने काही बाबींमध्ये त्रास होईल. नोकरी, व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल.

वृषभ – आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था आपल्याला महत्त्वाच्या संधीपासून दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही.

मिथुन – आजचा दिवस उत्साह आणि स्फूर्तिदायक आहे. स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र आणि आप्तांचा सहवास यामुळे दिवस खूप आनंदात जाईल. दाम्पत्य जीवनात सुख-समाधान लाभेल.

कर्क – आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. त्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. द्विधा मनस्थिती राहिल्यामुळे महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका.

सिंह – आजचा दिवस लाभदायक ठरेल. मात्र मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल.

कन्या – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. नोकरीत पदोन्नती संभवते. मान सन्मान मिळतील. सरकारी कामे होतील.

तूळ – व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल.

वृश्चिक – उक्ती आणि कृतीवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे आज हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे पिणे सांभाळा.

धनु – मेजवानी, सहल, रुचकर भोजन, प्रवास, सुंदर वस्त्रधारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल.

मकर – आज व्यापार व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायी असल्याने आर्थिक देवाण घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल.

कुंभ – आज चंद्र रास बदलून मिथुन राशीत येईल. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज आपण संतती आणि स्वत:चे स्वास्थ याबाबत चिंतीत राहाल.

मीन – आज शारीरिक आणि मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबीयांशी वादविवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनांमुळे आपला उत्साह कमी होईल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.