loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील लेंडी नदी वरील मुख्य पुलाच्या मोऱ्या कचरा व घाणीने बंद

Sep 19, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहर व परिसरात काल रविवार संध्याकाळ पासून जोरदार पाऊस चालू असून शाकांबरी नदीला पुर आलेला असून लेंडी नदीला सुद्वा पाणी वाढलेले आहे .

शाकाबंरी नदीवरील नगरपालिकेच्या मागील पादचारी पुलावरून पाणी वाहत असल्याने हा पुल वाहतूकीला बंद करण्यात आला आहे.
शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या लेंडी नदीला सुद्वा पुर आला असून या नदीला येवला रोड कडील मल्हारवाडी येथील डोंगराचे पाणी मोठया प्रमाणावर येत असून हया पाण्यामुळे नदीला पुर आला आहे .


नांदगाव नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून लेंडी नदीच्या पुलावरील अतिक्रमणे हटविली तसेच रेल्वे सब वे जवळील मटन मार्केट पाडले . पण येथील विस्थापितांची कुठेही व्यवस्था केली नाही . मटन मार्केट मधील सर्व व्यावसायकांनी रस्त्यावर आपली दुकाने थाटल्याने रहदारीला मोठा अडसर निर्माण झाला आहे.
लेंडी नदी पुलावरील अतिक्रमणे हटविली पण पुलाखालून पाणी वाहून जाणाऱ्या मोऱ्या साफ केल्या नाही . या मोऱ्या मध्ये मोठया प्रमाणावर भाजी माक्रेट चा कचरा अडकलेला आहे. त्यामुळे हे पाणी शहरात शिरू शकते अशी परिस्थीती तयार झाली आहे.
लेंडी नदीच्या मुख्य उगमा वर आज तरी पाऊस कमी असल्याने दहेगाव धरण अद्याप भरलेले नाही . दहेगाव धरण आज मितीस ७० % भरलेले आहे. पाऊसाचे वातावरण पहाता दहेगाव धरण केव्हाही भरू शकते . हे धरण भरल्यावर नदीला मोठा पुर येवू शकतो .
नगरपालिका केवळ रिक्शामधून माईक द्वारे सावधानतेचा इशारा देत आहे. पण याच लेंडी नदीवरील पुला तून पाणी वाहण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्याकडे लक्ष देत नाही.
शहराच्या मुख्य बाजारपेठेत व मध्य वस्तीत येण्यासाठी येणारे रस्ते अतिक्रमणामुळे अरूंद झालेले आहे . रेल्वे गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे भोंगळे रोड वरती रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाडे, मच्छी व मटनाची दुकाने भाजीपाला वाले यांनी मोठया प्रमाणावर अडचण निर्माण केली आहे. भोंगळे रोड वरील नगरपालिका शॉपिंग सेंटर समोर तर वेल्डींग दुकानदारानीं रस्त्यावर आपली दुकाने थाटली आहे.

नगरपालिका पुरस्कृत अतिक्रमण

या अतिक्रमीत व्यावसायीकां कडून नगरपालिका रोज पावती द्वारे कर वसूल करीत असून हे अतिक्रमण नगरपालिका पुरस्कृत असल्याचे वाटते .
नगरपालिका हद्दी तील चांडक प्लॉट,भोलेनगर, इंद्रायणी नगर,अब्दुल करीमशेट चाळ,विजय ऑईल मिल,शिंदेवस्ती या भागातील रहिवाशांना शहरात येण्यासाठी कुठूनही रस्ता राहिलेला नाही .


अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.