loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२२ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा दररोज नव्या पाककृती तयार करतात अंगणवाडी मदतनिस ताई वंदना नारखेडे

Sep 19, 2022

पालकांकडून या अभिनव उपक्रमाचे होते आहे कौतुक👉 शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२.. दिनांक १ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२२ सर्वत्र साजरा केला जातो आहे..याकालावधीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अधिनस्त अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांचे दैनंदिन वेळापत्रकानुसार आयोजन केले जाते आहे..पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणणेसाठी लोकसहभाग मिळविला जात आहे..यात विविध थीमवर आधारीत उपक्रम राबवुन सोशल मिडियाचा जास्तीत-जास्त वापर करुन जनजागृती केली जात आहे..या पोषण महिन्याचे औचित्यसाधून लाभार्थींना पोषणासाठी उपयुक्त ठरणारी अशी दररोज एक पाककृती बनवून त्या व्हाट्स अँपगृपद्वारे पालकांपर्यंत पोहोचवत आहेत..सदर पाककृती सोशल मिडियावर टाकल्या जात आहेत..जेणेकरुन इतर नागरिकांनाही याचा फायदा व्हावा…वंदना नारखेडे ताई या फक्त पाककृतीच तयार करत नसुन त्या पाककृतीची सविस्तर माहिती, त्यासाठी लागणारे साहित्य, पाककृतींचा लाभार्थींना होणारा फायदा याबाबीही त्या सर्वांपर्यंत सोशल मिडियाद्वारे मेसेज करुन पोहोचवत आहेत..यासर्व पाककृती स्थानिक पदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या वापरुन बनविल्या जाताता..ह्या पाककृतींद्वारे लाभार्थी/पालकांना स्थानिक पदार्थांचा आहारात वापर व उपयोग याबाबीही पटवून दिल्या जात आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे पालकवर्गाकडून कौतुक केले जात असल्याची माहिती मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.