loader image
[ays_poll id=7]

मनमाड विभाग येथे ,अंगणवाडी क्र. ७५ ,८१,100 यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भवती महिलांसाठी व बालकांसाठी स्थानिक पोषण आहार विषयक जनजागृती करण्यात आली सिमा चौधरी अंगणवाडी सेविकाताई

Sep 19, 2022


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक – २,पोषण महा अंतर्गत १ ते ३० सप्टेंबर २०२२ यात महिला आणि बालक याच्यांसाठी उपलब्ध स्थानिक आहाराची जसे की -ज्वारी/ बाजरी/ दादर /नागली /भगर/ राजगिरा /अळीव /यासारखे भरड धान्य कडधान्य/ शेवगा/ चवळी/ टाकळा/ आळुचे पान/ दुधीभोपळा/ लाल भोपळा /गिलके /दोडके कढीपत्ता/ पपई /पेरू /सिताफळ इत्यादी व यासारख्या हंगामी स्थानिक पारंपारिक भाज्या, फळे,इतरही फळभाज्या वापरून केलेल्या स्थानिक पारंपारिक आहाराचे महत्व पटवुन दिले, पुरक पोषण आहार म्हणजे नुसते महागडे अन्नपदार्थ,तेलकट,तुपकट पदार्थ खाणे नव्हे तर स्थानिक उपलब्ध ,भाज्या,फळभाज्या इतर अन्नघटकांचा योग्य प्रमाणात, योग्य रितीने वापर करणे होय याविषयी जनजागृती करण्यात आली, या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका,सिमा चौधरी,कल्पना जाधव,राजश्री निकम,मदतनिस ताई मनिषा वाघ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले..

 


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.