loader image
[ays_poll id=7]

वैशंपायन परिवाराचे सामाजिक योगदान, पितृपक्षात नाविन्यपूर्ण रीतीने केले पूर्वजांचे स्मरण

Sep 20, 2022


(हर्षद गद्रे सर) मनमाड शहरातून भारतीय खाद्य निगम अर्थात एफ सी आय मधील सेवानिवृत्त व्यवस्थापक कै. राम वैशंपायन व कै. शैलजा वैशंपायन यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दोन्ही कन्या वैशाली वैशंपायन( सुरतकर) व कल्याणी वैशंपायन यांनी इंडियन हायस्कूलला 51 हजार रुपयांचे दोन धनादेश विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त देणगी म्हणून दिले. याचा विनियोग विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य करण्यासाठी करण्यात यावा अशी वैशंपायन परिवाराची इच्छा आहे.


राम वैशंपायन हे इंडियन हायस्कूलच्या शिक्षक पालक संघाचे तीन वर्षे अध्यक्ष होते. मनमाडला वास्तव्यास असेपर्यंत शाळेशी त्यांनी ऋणानुबंध जपला होता. त्यांचा हाच वारसा त्यांच्या दोन्ही कन्यांनी पुढे चालविला.

आपण ज्या शाळेत शिकलो ज्या शाळेने आपल्या पंखात बळ दिले त्या शाळेचे ऋण त्यांनी आपल्या माता-पित्यांच्या नावाने देणगी देऊन व्यक्त केले. विद्यालयात झालेल्या एका छोटेखानी समारंभात राम वैशंपायन यांचे जावई प्रशांत सुरतकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रमाकांत मंत्री, इंडियन हायस्कूलचे संचालक विक्रम सप्रे, पी बी कुलकर्णी, मुख्याध्यापिका क्रांती कुंजरकर, यांच्या उपस्थितीत धनादेश विद्यालयास प्रदान करण्यात आले. याप्रसंगी रमाकांत मंत्री, क्रांती कुंजरकर, हर्षद गद्रे, प्रशांत सुरतकर, यांची समायोजित भाषणे झाली.
वैशंपायन परिवाराने दाखविलेले सामाजिक भान वाखाणण्या जोगे आहे. पितृपक्षात या दोन्ही बहिणींनी अतिशय नाविन्यपूर्ण रीतीने आपल्या पूर्वजांचे स्मरण केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.