loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २२ सप्टेंबर २०२२ – गुरुवार

Sep 22, 2022


मेष – आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

वृषभ – आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्य रचना करू शकाल.

मिथुन – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटले तरीही नंतर त्यात यश मिळेल.

कर्क – आजचा दिवस सर्व दृष्टीने आनंददायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयां कडून सौख्य व आनंद ह्यांची प्राप्ती होईल. तसेच त्यांच्या कडून काही भेटवस्तू मिळतील.

सिंह – आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा.

कन्या – आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र – मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होईल.

तूळ – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल.

वृश्चिक – आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात.

धनु – आज आपणास खूप सावध राहावे लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. पाण्या पासून सावध राहावे लागेल.

मकर – आज आपल्या विचारात व व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर व मन, स्फूर्ती व प्रसन्नतेने भरेल.

कुंभ – आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील.

मीन – आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्या पासून शक्यतो दूर राहावे.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.