
शुक्रवार दिनांक २३/९/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता पल्लवी मंगल कार्यालय येथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबादासजी दानवे हयांचा नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार तसेच शिवसेना पदाधिकारी,महिला आघाडी,शिवसैनिक यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यावेळी कोविड काळात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या कोविड योद्धांचा गौरव सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमास शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, आजी – माजी नगरसेवक, युवा सेना, महिला आघाडी,युवती सेनेच्या सर्व कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे असे आवाहन मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.












