loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा व ग्रामीण उपजिल्हा रुग्णलय यांचे संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

Sep 23, 2022


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ७२ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने भाजपा तर्फे सेवा पंधरवडा सुरू आहे याच अंतर्गत भारत सरकार मधील केंद्रीय आरोग्य व कुटंबकल्याण राज्य मंत्री आदरणीय डॉ सौ भारती पवार यांचे संकल्पनेतून आणि प्रेरणे ने आज शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आणि मनमाड शहर भाजपा यांचे संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.मनमाड शहर भाजपा अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी स्वतः नेत्र तपासणी करून या आरोग्य शिबिराचा शुभारंभ केला भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितिन पांडे, भाजपा युवा मोर्चा नासिक जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे,भाजपा अर्थिक सेल चे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल लुणावत भाजपा माथाडी कामगार सेल चे जिल्हा अध्यक्ष नारायण पवार ,डॉ मोरे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून या प्रसंगी उपस्थित होते या आरोग्य शिबीरात तपासणी करणे साठी मनमाड शहर व ग्रामीण परिसरातील गरजू रुग्णानी मोठी गर्दी केली या सेवा कार्यक्रमास भाजपा शहर सरचिटणीस नितिन आहिरराव, भाजपा मनमाड शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे,भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस गौरव ढोले, भाजपा दीव्यांग आघाडी चे मनमाड शहर अध्यक्ष दीपक पगारे,भाजपा शहर उपाध्यक्ष धीरज भाबड आदी प्रमूख पदाधिकाऱ्यांन सह भाजपा कार्यकर्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य शिबिराचे संयोजन ग्रामीण उपजिल्हा रुग्णालया च्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.