loader image
[ays_poll id=7]

नांदगावकर प्रवाशी संघटनेची स्थापना ; बबलू सय्यद यांची निवड

Sep 25, 2022


नांदगाव – आंदोलने झाली,निवेदने झाली मात्र कोरोनापूर्वी सुरु असलेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत होत नसल्याने आम्ही नांदगावकर यासाठी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत असूनही त्याला समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने आज नांदगावकर प्रवासी संघटनेची घोषणा करून बबलू सय्यद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तदनंतर नांदगाव रेल्वे स्टेशनवर जाऊन आम्ही दिलेल्या निवेदनांवर नक्की काय केले? याबाबत विचारणा केली असता त्यात समाधानकारक उत्तर मिळाले नसून आम्ही नांदगावकर च्या वतीने पुढील नियोजन ठरवत येणाऱ्या काळात हा पाठपुरावा चालूच राहील असे ठणकावण्यात आले.

आता कोरोनापूर्वी नांदगाव स्थानकावर गाड्यांचे पूर्ववत असलेले थांबे रेल्वे प्रशासन कधी करणार याकडे समस्त नांदगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.या प्रसंगी संतोष गुप्ता,विजय चोपडा, बबलू सैयद,दिनेश पिगले अरुण भोसले, अभय भोसले,योगेश पाटील,संजय मोकळ,योगेश पाटील, वाल्मिक जेजुरकर, महेश माहोरे आदी नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.