loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २९ सप्टेंबर २०२२ – गुरुवार

Sep 29, 2022


मेष – वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल.

वृषभ – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल.

मिथुन -आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद – विवाद व बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे.

कर्क – आज आपल्यात आनंद व स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल.

सिंह – आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल.

कन्या – आज कुटुंबातआनंदाचे वातावरण राहील. इतरांशी गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील.

तूळ – आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल व त्यामुळे कामे सफल बनतील.

वृश्चिक – आज आपला पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजन ह्यासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. एखादी दुर्घटना संभवते.

धनु – आजचा दिवस लाभदायक आहे. संसारात सुख – शांती नांदेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल.

मकर – आज व्यापार – व्यवसायात लाभ होईल. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल.

कुंभ – आज आपण जरी शारीरिक दृष्टया अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल.

मीन – आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते.


अजून बातम्या वाचा..

.