एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नासिक २ अंतर्गत मनमाड विभागातील अंगणवाडी क्र.८१ गुरुद्वारा एरिया मध्ये राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर २०२२ निमित्त अंगणवाडीत ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गरोदर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. देवरे,डाँ.संगिता काळे ,आरोग्य सेविका गायत्री भुरे उपस्थित होते. यांनी परिसरातील गरोदर महिला तसेच इतर महिला पालक वर्ग हे उपस्थित होते.गरोदर महिलांना आहार व आरोग्य,स्वच्छते विषयी मार्गदर्शन करण्यात आले .गरोदरपणातील संभाव्य धोके टाळण्यासाठी आपला आहार व आरोग्य कसे असावे,आहारात कोणते पदार्थ घ्यावे ” माता सुरक्षित घर सुरक्षित” याविषयी समुपदेशन केले.या कार्यक्रमात परिसरातील गरोदर,स्तनदा,किशोरी उपस्थित होत्या या कार्यकर्माचे आयोजन अंगणवाडी सेविका सिमा चौधरी व मदतनीस मनिषा वाघ यांनी केले.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये विद्यार्थी पदग्रहण आणि शपथविधी सोहळा संपन्न
मनमाड - येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये नवनिर्वाचित शाळा नायक नायिका विद्यार्थी, क्रीडा प्रमुख...










