ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार टेणी यांचे आज उपचार सुरू असताना मुंबईत दुःखद निधन झाले. दैनिक लोकमत, देशदूत, नवशक्ती, लोकनामा यासह विविध दैनिकात त्यांनी वृतसंपादक, संपादक अशा अत्यंत महत्वाच्या भूमिका पार पाडत मराठी पत्रकारिता क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटविला होता. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतिशय महत्वपूर्ण असून त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासू पत्रकार कायमचा पडद्याआड गेला आहे.तसेच मराठी पत्रकारिता क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. नंदकुमार टेणी यांना भावपुर्ण श्रध्दांजली
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...











