मनमाड शहरात मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महात्मा फुले चौकातील कटलरी दुकानासमोर उभ्या असलेल्या ॲक्टिवा दुचाकीच्या डीक्कितून दोन लाखाची रोकड लांबविल्याने एकच खळबळ माजली आहे. येथील कॅम्प विभागात राहणाऱ्या कल्पना मुरलीधर देवकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मधून सकाळी ११ वाजता खात्यातून रक्कम काढून आपल्या गाडीच्या डीक्कित ठेवले व महात्मा फुले चौकातील एका कटलरी दुकानात खरेदी साठी गेली असता सदरील घटना घडली. अत्यंत वर्दळीच्या मार्गावरून रोकड लंपास झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये बालकाच्या शिल्पाचे अनावरण
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये बालदिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यास...












