loader image
[ays_poll id=7]

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध देय रकमा अदा कराव्यात : म्युनिसिपल कामगार सेनेची निवेदनाद्वारे मागणी

Oct 6, 2022


मनमाड नगर परिषद म्युनिसिपल कामगार सेनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या विविध देय मागण्यांबाबत चे निवेदन सोमवार दिनांक ३/१०/२०२२ रोजी मुख्याधिकारी यांना देण्यात आले. २२ ऑक्टोंबर पासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेतील कायम,सेवा निवृत्त कर्मचारी व शिक्षिका मदतनीस यांच्या विविध मागन्यांचे निवेदन देण्यात आले. पालिकेतील कायम, सेवानिवृत्त कर्मचारी व बालवाडी शिक्षिका मदतनीस यांचे माहे ऑक्टोंबर चे वेतन दिवाळी सणापूर्वी अदा करण्यात यावा, कायम कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त शासन निर्णयानुसार तसेच मानधन शिक्षिका व मदतनीस यांना सण ॲडवान्स रू.५००० अदा करण्यात यावा, कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाच्या फरकापोटी रुपये ३०००० अदा करण्यात यावे, नियमित वेतन श्रेणी लाभ प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस/ सानुग्रह अनुदान देण्यात यावे, न.पा. कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणे कामी न.पा.प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, न.पा तील ५/०२/२०१९ पासून कायम करण्यात आलेल्या सर्व रोजंदार ३ व ४ यांना वेतनाची फरकाची रक्कम सणापूर्वी अदा करण्यात यावी, न.पा. तील सण २००५ नंतरची DCPS योजनेत बदल होऊन ती NPS योजना लागू झालेली आहे, कपात झालेल्या रकमेची माहिती व NPS ची सद्यस्थिती ची माहिती मिळावी, अनुकंपा तत्वावर उमेदवारांना नियुक्ती संदर्भात होणारा विलंब व असलेल्या तृटी न.पा.प्रशसाने मा.आयुक्त व संचालनायाशी पत्रव्यवहार करून अनुकंपा धारकांना न्याय मिळवून द्यावा ह्या प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.निवेदनावर नितीन पाटील,आनंद औटी,किशोर व्यवहारे, बाळासाहेब दराडे,रवी थोरे आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती आमदार कांदे तसेच जिल्हाधिकारी नाशिक यांना पाठविण्यात आल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.