loader image
[ays_poll id=7]

झाशीची राणी लक्ष्मीबाई नवदुर्गा महिला नवरात्रोत्सव मंडळ आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण राजेश कवडे यांच्या हस्ते संपन्न

Oct 6, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शहरातील इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट) येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने आरतीचा मान प्रत्येक माळीला शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांना देण्यात आला होता. यात आज नांदगाव नगरपरिषदचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांना आरतीला निमंत्रित करण्यात आले होते या प्रसंगी झाशीची राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाच्या वतीने त्यांचा गुलाब पुष्प,शाल देउन सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यात प्रथमच झाशीची राणी लक्ष्मीबाई महिला मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी झी मराठी,कलर्स मराठी, झी अनमोल, वहिनीचे प्रमोशन प्रो.कबड्डी लीगचे,अँकर या वाहिनीची हास्य कलाकार सुप्रसिद्ध सचिन अहिरे सचिनभाऊजी यांचा जोरदार धडाकेबाज हास्यांच्या मैफिलीत आकर्षक बक्षिसांचा पाऊस पडून महिलावर्गाने मोठा प्रतिसाद नोंदवला होता.


लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या जल्लोषाने आनंदाने कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. आजीबाईंची उखाणे,वहिनींचीउखाणे,तळ्यात मळ्यात, फुगे फोड, या मध्ये कपल जोडी चेहर्‍यावर लहान बाळाची रंगरंगोटी या कार्यक्रमाचा विषेश आकर्षण खेळ ठरला. या खेळात चार जोडीने सहभाग घेतला होता त्यात पत्रकार प्रज्ञानंद जाधव, प्रियंका जाधव, हे विजेते ठरले तर तळ्यात मळ्यात या खेळात ज्योती सुरसे या विजेते झालेत, नोजकॉटन मोजणी मध्ये निलेश इपर, जयश्री इपर,सिंगल महिला फुगे फोड यामध्ये राधिका फोफलिया यांनी प्रथम क्रमांक पटकावला, डबल मध्ये विनोद मांडे, शितल मांडे यांनी बाजी मारली. प्रत्येक खेळात विजेत्याला मंडळाच्या अध्यक्षा जानवी शर्मा, होम मिनिस्टर अॅकर सचिनभाऊजी, नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले याप्रसंगी जेष्ठ नागरिक व परीसरातील माता भगिनींना व नागरीकांना मा.नगराध्यक्ष कवडे यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
नऊ दिवस नवरात्र उत्सवात झालेल्या लिंबु चमचा, संगीत खुर्ची, बास्केट बाॅल, मटकी फोड, विजेते स्पर्धकांना त्यांच्या शुभहस्ते बक्षीस वाटप करण्यात आले व मोठ्यांचा आशिर्वाद घेउन पुढील विवीध सामाजिक कार्यक्रमासाठी जाण्यासाठी सर्वांची त्यांनी रजा घेतली


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राखी जाधव,शीतल मांडे,कविता आहेर,जयश्री इपर,शिल्पा महाजन,मंदा कुमावत,ज्योती काळे, मयुरा फोफलिया,मंदा चव्हाण,तसेच परिसरातील सर्व लहान मोठे जेष्ठ रहिवाशी यांचे योगदान लाभले तर सूत्रसंचालन ज्योती सुरसे यांनी केले तर महावीर जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.