Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

८७ व्या धर्मांतर घोषणा दिनानिमित्त १५ वा मुक्ती महोत्सवाचे आयोजन ११,१२,१३ ऑक्टोबर २०२२ रोजी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

Oct 10, 2022

येवला ( प्रतिनिधी)
मानव मुक्तीच्या गर्जनेने जगप्रसिद्ध झालेल्या मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येथील लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक महाराष्ट्र मुक्ती महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महोत्सवाचे निमंत्रक तथा प्रवर्तक एस डी शेजवळ यांनी दिली आहे दिनांक ११,१२,१३ ऑक्टोबर तीन दिवसीय मुक्ती महोत्सव अंतर्गत दिनांक ११ ऑक्टोबर स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम तयारी व आव्हाने या विषयावर येथील नवचेतना करिअर अकॅडमीचे प्रा शुभम निघूट यांचे व्याख्यान आयोजित केली असून दिनांक १२ ऑक्टोबर रोजी भारतीय संविधान संवर्धक व प्रचारक रोहित घोटेकर महाराज यांचे संविधान कीर्तन आयोजित करण्यात आले आहे हे दोन्ही कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृह येवला (नाशिक) येथे रोज सायंकाळी ठीक ५ वा. आयोजित करण्यात आले असून दि.१३ ऑक्टोबर रोजी मुक्तीभूमी येवला येथे बुद्ध-आंबेडकर सामाजिक प्रबोधन गीतांचा आंबेडकरी शाहिरी जलसा अर्थात मुक्ती पहाट हा कार्यक्रम होणार असून ऐतिहासिक मुक्तीभूमी येथे स्मारकास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांस फुलहार अगरबत्ती उदबत्ती अगरबत्ती यावर निरर्थक खर्च करण्यापेक्षा ग्रामीण भागातील दलित आदिवासी भटक्या विमुक्त व मागास वर्गीय विद्यार्थ्यांना त्याच पैशातून शैक्षणिक साहित्य संकलित करण्यासाठी आवाहन केले जात आहे निरर्थक अनाठाई खर्चाला फाटा देऊन शैक्षणिक उपयुक्त अशी शैक्षणिक साहित्य(वही,पेन,कंपास बॉक्स, दप्तर) सदर प्रसंगी दान घेण्यात येणार असून ती गरजू विद्यार्थी आश्रम शाळांना वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर मुक्ती महोत्सव समितीच्या वतीने रक्तदान व सर्व रोग निदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक वस्तीगृहाचे अधीक्षक बी.डी.खैरनार,लोखंडे,अशोक पगारे,अभिमन्यू शिरसाठ,शरद शेजवळ,सुरेश खळे,राजरत्न वाहूळ,एस एन वाघ,विश्वास जाधव,एम एस सोनवणे यांनी दिली आहे.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे...

read more
डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]