loader image
[ays_poll id=7]

बाळासाहेबांची शिवसेना गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केले चिन्ह, कोणते चिन्ह मिळणार?

Oct 11, 2022

उद्धव ठाकरे यांच्या गटाला काल ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने चिन्हांसाठी दिलेला प्रस्ताव निवडणूक आयोगाने नाकारला होता. चिन्हांसाठी तीन नवे प्रस्ताव देण्यास सांगण्यात आल्यानंतर आज 11 ऑक्टोबर रोजी बाळासाहेबांची शिवसेना गटाने काही पर्याय सादर केले आहेत. हे पर्याय ई-मेलद्वारे सादर करण्यात आले आहेत.

तुतारी, शंख, रिक्षा, पिंपळ, ढाल-तलवार, तळपता सूर्य हे पर्याय बाळासाहेबांची शिवसेना गटाने मागितले आहेत.

त्रिशूळ चिन्हाशी धार्मिक भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ते देता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. उगवता सूर्य या चिन्हाशीही धार्मिक भावना संलग्न असल्याने तेही देता येणार नाही, असं आयोगाने 10 ऑक्टोबर रोजी स्पष्ट केलेले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.