मनमाड – ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल निशाणी मिळाल्यानंतर आज मनमाडला एकात्मता चौकात आजी माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जमत मशाल पेटवत जल्लोष केला. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल चिन्ह दिल्यानंतर शिवसैनिक हातात मशाल घेऊन रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी एकात्मता चौकात फटाक्याची आतषबाजी करत मशाल पेटवून जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेनेची निशाणी मशाल, आमची निशाणी मशाल अशा घोषणा देत या निशाणीला घराघरात पोहचविणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
पालिका सफाई कामगारांचे घराचे स्वप्न साकार, 34 कामगारांना मिळाले हक्काचे घर
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाड नगर पालिकेच्या सफाई कामगारांच्या हक्काच्या घराचा...











