loader image
[ays_poll id=7]

येवला शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्तीची मागणी

Oct 13, 2022


येवले शहरातील मुख्य नांदगाव रोडला मोठमोठे खड्डे पडून रोड खचल्याने नागरिकांना व वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागत आहे. येवले शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हजरत सैय्यद बाबा दर्गाह चौक हिंदुस्थानी मस्जिद मागील बाजूला असलेला मुख्य नगरसूल नांदगाव रोड ते औरंगाबाद हायवे लगत अण्णाभाऊ साठे नगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर सुलभ सौचालय, हजरत सैय्यद बाबा दर्गाह शरीफ मार्ग. (नांदगाव रोड ) डी पी रोड या परिसरातील रस्त्यांवर पूर्णपणे खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाल्याने रस्त्याला मोठ – मोठे खड्डे पडले असून सा. बां. विभाग डोळे झाक करीत आहे. गेल्या 25 ते 30 वर्षां पासून लक्ष्मी आई माता मंदिर औरंगाबाद हायवे क्रॉस 40 गाव राज्य मार्ग पूर्ण पणे खड्ड्यात गेल्या मुळे दुचाकी चार चाकी वहाने या मध्ये अपघातात वाढ झालेली आहे.ह्या संपूर्ण परिसरात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. ह्या संबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर राष्ट्रीय स्वाभिमानी जन संघर्ष विकास आघाडी. येवला शहर व. तालुका स्वाभिमानी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. शेरूभाई मोमीन, सोमनाथ रोकडे, अल्ताफ पठाण, आश्रफ मोमीन,हुसेन अन्सारी, शकील अन्सारी,सिद्धीक अन्सारी, सलीम सैय्यद, हमीद बाबा अन्सारी, हुसेन कुरेशी, कचरु जानराव, अकील बाबा, मोबीन मुलतानी,ऐकबाल अन्सारी, मजीद अन्सारी, अरफात मोमीन, सलमान मोमीन, गणेश लुलेकर, जाहीद खान, रिजवान अन्सारी,फहीम शेख, शकील शाह आदींसह सदस्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहे.ह्या मार्गावरील खड्डे त्वरित न बुजवल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून वृक्षारोपण व खड्ड्यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येईल याची प्रशासनाने त्वरित नोंद घ्यावी निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे रवाना करण्यात आले आहेत


अजून बातम्या वाचा..

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

शिस्त–जिद्द–ध्येयाचा संदेश देत सिद्धी क्लासेस कॅम्पसचा ‘आशीर्वाद व शुभेच्छा सोहळा’ दिमाखात संपन्न

      मनमाड : येथील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धी क्लासेस...

read more
नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती  वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

नरेंद्रजी मोदी 3-0 सरकारचा ऐतिहासिक अर्थ संकल्पा मध्ये देशातील “युवा शक्ती केंद्र बिंदू.”देशाच्या प्रगतीची गती वाढवणारा गतिमान अर्थ संकल्प ~नितीन पांडे

संपूर्ण जगात सतत युद्ध जन्य परिस्थिती चे संकट असताना भारताचे शक्तिशाली पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी...

read more
माघ मास संकष्ट चतुर्थी  निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 05/02/2026 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम🚩

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

आज नाशिक येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय (नाशिक जळगाव धुळे नंदुरबार)शालेय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

मोदीनगर उत्तरप्रदेश येथे ४ ते १४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय यूथ जूनियर व सीनियर...

read more
.