loader image
[ays_poll id=7]

गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करण्याची वाट होती – घोटेकर

Oct 17, 2022


आपला तो एक संविधान धर्म, तोच आचरावा भारतीयांनी –
भा.सं. सं.प्र.रोहितकुमार घोटेकर
मुक्ती महोत्सवात भारतीय संविधानावर संकीर्तन सादरीकरणाचा अनोखा प्रयोग

गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करण्याची प्रकाश वाट होती – घोटेकर

मुक्ती महोत्सवाची सांगता
येवला (प्रतिनिधी)
मुंबई इलाका दलित वर्ग परिषदेच्या १३ ऑक्टोबर १९३५ रोजी झालेल्या ऐतिहासिक परिषदेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा ही जगातील तमाम प्रकारच्या गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करण्याची प्रकाश वाट होती. जी प्रकाश वाट येवल्याच्या ऐतिहासिक भूमीतून भीम गर्जनेने केली आहे पुढे तथागत बुद्धाचा धम्म जगाला बहाल करून निशस्त्र क्रांती घडून धर्मांधता,अनिष्ट प्रथा परंपरा रुढी यातून मुक्ती देणारी,सर्वधर्म सन्मान करून मानवी मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारी माणसाला माणूस जोडणारी, जगातील राज्यघटना लिहून सर्व धर्म ग्रंथांचा अभ्यास करून तुम्हाला मला संविधानरूपी राष्ट्रग्रंथ देतात ही जगातील ज्ञानदानाची परमोच्च किमया असल्याचे उदगार भारतीय संविधान संवर्धक व प्रचारक भा.सं.सं.प्र रोहितकुमार घोटेकर यांनी काढले.
धर्मांतर घोषणेच्या ८७ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय संविधान संकीर्तन सादर केले त्यावेळी ते बोलत होते.
आपला तो एक संविधान धर्म,तोच आचरावा भारतीयांनी।सव्वीस नोव्हेंबर एकुणिसे एकोणपन्नास रोजी अर्पिला लोकांनी स्वतःशी।
लोकशाही,समता,स्वातंत्र्य,न्याय बंधुता,धर्मनिरपेक्षता, हेच तत्व अंगीकारावे।राष्ट्राची एकता-एकात्मता।उध्दार देशाचा करण्यासाठी।संविधान उद्देशिक कोरा काळजावर।तीच आचरा जीवनभर।
ह्या संविधान अभंगाचे सविस्तर निरूपण घोटेकर यांनी केले.
कोणत्याही व्यक्तीला आपले वैयक्तिक,सार्वजनिक जीवन जगतांना धर्म आवश्यक असतोच पण माणूस धर्मकर्ता की धर्म माणसा करता याचे चिंतन होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.कोणतेही राष्ट्र केवळ धर्म-धर्मग्रंथ यावर चालू शकत नाही तसे असते तर जगाच्या पाठीवर धर्मावर देश उभे राहिले असते असे सांगून राष्ट्राला राज्यघटना-संविधान आवश्यक असते असे घोटेकर म्हणाले.
भारतातील धर्मव्यवस्थेला कमीत कमी धक्का बसेल व रक्ताचा एक थेंबही सांडू न देता बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची किमया केली आहे.
भारताला राष्ट्र म्हणून अखंड-अभंग ठेवण्याचे सामर्थ्य केवळ भारतीय संविधानातच आहे म्हणून भारतीयांनी प्रथमतः व अंतिमतः भारतीयच असले पाहिजे व आपला धर्मग्रंथ भारतीय संविधान अंगिकरून आचरण केले पाहिजे असे घोटेकर म्हणाले.
भारतीय संविधान लोकमानसात रुजण्यासाठी साहित्यिक,सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून प्रयत्न होते गरजेचे असून संविधान संकीर्तन-कीर्तन हा राष्ट्र संत तुकोबा,गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांनी बुद्धा पासून धम्म संगिनी धम्म प्रवचन वारसा असून नव्या सांस्कृतिक मांडणीतून भारतीय संविधानाचा कीर्तन-प्रवचनातून संस्कार केला जावा असे मत यावेळी बोलताना शरद शेजवळ यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अझर शहा हे होते.प्रारंभी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून इकरा शहा हिने भारतीय संविधानाची उद्देशिका म्हणून कार्यक्रमात चे उदघाटन करण्यात आले.संविधान कीर्तनकार रोहितकुमार घोटेकर यांना कुणाल ठाकरे,साक्षी गुंजाळ,प्रांजल पवार,राधा घोडेराव,आदर्श सोनावणे,मनोज गुंजाळ,संकेत गुंजाळ,समीक्षा धिवर(टाळ)अनुष्का धिवर(विना), सिद्धार्थ गुंजाळ (पखवाज) वाद्याची साथसंगत केली.ह्या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सविता धिवर,सुरेश खळे मामा,महेंद्रभाऊ पगारे,अभिमन्यू शिरसाट,अशोक पगारे,विकास वाहुळ हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसंत पवार,सुमित गरुड,अक्षय गरुड,ललित भांबेरे,साहिल जाधव,रोहित गरुड,सचिन गरुड आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शरद शेजवळ,सूत्रसंचालन राजरत्न वाहूळ तर आभार अधीक्षक बी.डी.खैरनार यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.