loader image
[ays_poll id=7]

रमेशशेठ दंडगव्हाळ : दिवाळीतच दिवा विझला !

Oct 25, 2022


परिस्थितीने सामान्य पण मनाने श्रीमंत नांदगावचे सख्खे शेजारी. रमेशशेठ दंडगव्हाळ यांनी कालचं लक्ष्मीपूजन आटोपून या जगाचा उजडण्यापूर्वीच नाशिक मुक्कामी निरोप घेतला. दिवाळीतच दिवा विझला.
रामेशशेठ हे ‘शेठ’ या उपाधीला वेगळ्याअर्थाने सार्थ होते. त्यांची मनोवृत्ती कुजकी नव्हती. सतत दुसऱ्याच्या भल्याचा विचार करीत असत. दुसऱ्याने वाईट केले तरी ते त्यावर अवाक्षरही बोलत नसे. जो दुसऱ्याचे वाईट करील त्याचे आपोआप वाईट होईल, ही त्यांची धारणा होती. त्यांच्या जगण्याची एक स्वतंत्र फिलॉसॉफी होती. मनाचे पदर ते कोणाजवळही उघड करत नसे. दुःख कसे गिळावे हे त्या माणसाकडून शिकण्यासारखे होते. तेच आता सणासुदीला कुटुंबाला तसेच मित्र परिवाराला दु:खाच्या खाईत लोटून गेले, आता सावरायचे कसे असा प्रश्न आहे. नांदगावला त्यांचेवर अनेक संकटे कोसळली परंतु त्यांनी हिंमत कधी हारली नाही.त्यानंतर मुलं नाशिकला व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावली. त्यांच्यासाठी त्यांनी नाईलाजाने नांदगाव सोडले. मन मात्र सारखं नांदगावचाच विचार करीत असे. नांदगावचे कुणी भेटले की त्यांना मनापासून आनंद वाटायचा. त्यांच्या या आनंदासाठी मी त्यांना आवर्जून भेटायचो. परवा त्यांच्या भेटीसाठी गेलो असता भेट झाली नाही. अचानक असे कुणालाही न सांगता ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
दंडगव्हाळ परिवारास वेगळी प्रतिष्ठा आहे. त्यांचे मोठे बंधू सुरेश उर्फ खंडू दंडगव्हाळ हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांचे धाकटे बंधू शंभूराजे त्यांच्यासोबत नाशिकला आले. चिरंजीव महेश याचे नाशिकच्या प्रधान पार्कमध्ये मोबाईलचे दुकान आहे. पुतण्या गौरव त्याला मदत करतो. तसे आता ह्या कुटुंबाचे छान चालले होते. त्यात रामेशशेठ यांच्या अचानक जाण्याने सर्व घडी विस्कळीत झाली आहे. रमेशशेठ यांची पोकळी सर्वांनाच जाणवेल. या दुःखातून सावरण्याची शक्ती निर्मिक त्यांच्या कुटूंबास प्रदान करो, भावपूर्ण श्रद्धांजली !
– भास्कर कदम, नांदगाव.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
.