Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कमलाक्षाय गणेश मंदिरात दिवाळी पाडवा निमित्ताने दिपोत्सव साजरा

Oct 26, 2022

मनमाड : दिवाळीला लक्ष्मीपूजनानंतर दुसरा महत्त्वाचा आणि वर्षभरातील साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा. अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दिपोत्सवही या दिवशी केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.याच दिवसाचे ओचीत्य साधुन मनमाड येथील आय. यु. डी. पी. परिसरात असणाऱ्या कमलाक्षाय गणेश मंदिरामध्ये पाडवा पहाटेला दिपोत्सव साजरा करण्यात आला.पहाटे गणेशाची पुजा करून भजन म्हणुन , सुंदर अशी रांगोळी काढुन , सुवसनिणींकडुन श्रीगणेशाची आरती करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील महिला भाविक उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड न्यायालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

मनमाड न्यायालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतांना...

read more

१८ तास अभ्यास करून अनोख्या पद्धतीने येथील अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक...

read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाड तर्फे मुलांना गरजेच्या वस्तूंची वाटप

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाड तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथील स्थापन...

read more

ऑल इंडिया एस.सी/एस.टि.रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या ओ/ला शाखेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तअभिवादन पर कार्यक्रम संपन्न

आज दि.०६/१२/२०२१ प.पूज्य विश्वरत्न महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]