loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – आय यू डी पी परिसरातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम

Oct 29, 2022

आय.यु.डि.पी. दर्शन फ्रेंड सर्कल मधील तरुणांनी उत्स्फूर्तपणे एक स्तुत्य ऊपक्रम राबविला. परिसरातील स्वच्छता करून अनेक स्वच्छतेचे, पर्यावरणाचे जनजागृतीपर संदेश देणारे फोमशीट बोर्ड तयार करून प्रत्येक घरांचे गेटवर लावण्यात आले. त्या बोर्डवर एक पाऊल स्वच्छतेकडे, कचरा घंटागाडीतच टाका, स्वच्छ शहर आनंदी शहर, पुढील पिढीसाठी चांगली देन, माझा परिसर स्वच्छ ठेवेन, स्वच्छ सुंदर परिसर आरोग्य नांदेल निरंतर, कचरा योग्य ठिकाणी ठेवा, पृथ्वी, पाणी, हवा ठेवा साफ नाहीतर पुढली पिढी नाही करणार माफ, असा संदेश देण्यात आला. प्रत्येक घराजवळ एक कुंडीमध्ये झाड लाऊन ते कुंडीतील झाडाची जोपासायला परिसरातील नागरिकांना दत्तक म्हणून देण्यात आले. या ऊपक्रमाचे कौतुक परिसरातील श्री. महाले परिवार, शिंपी परिवार, चव्हाण परिवार, साखरे परिवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष सचिन शिरुड या नागरिकांनी केले असून दर्शन फ्रेंड सर्कलच्या तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत. दर्शन फ्रेंड सर्कलचे सार्थक महाले, विशाल शिंपी, आकाश घुगे, अनिकेत चव्हाण, अक्षय सोनार, विकी आहिरे, मोहित घुगे, विपीन महाले, विनीत महाले, सिद्धेश महाले, दानिश कुरेशी या युवकांनी हा स्तुत्य ऊपक्रम राबविला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात तृणधान्यविषयी प्रगतिशील शेतकरी सोमनाथ गांगुर्डे यांचे व्याख्यान संपन्न

मनमाड महाविद्यालयात तृणधान्यविषयी प्रगतिशील शेतकरी सोमनाथ गांगुर्डे यांचे व्याख्यान संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे युनोस्को ने घोषित...

read more
इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत देविका व तनिष्का पंकज भुजबळ यांची सुवर्ण कामगिरी

इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्ड इनडोअर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत देविका व तनिष्का पंकज भुजबळ यांची सुवर्ण कामगिरी

माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या नाती व नांदगाव चे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या कन्या...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघातील अपंग बांधवांना सायकल चे वाटप

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून मतदार संघातील अपंग बांधवांना सायकल चे वाटप

नांदगाव सोमनाथ घोंगाणे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी स्वखर्चातून विविध लोक उपयोगी सुविधा लोकार्पण...

read more
शाहीर सुरेशचंद्र आहेर यांच्या घुंगरू सुटलं र कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

शाहीर सुरेशचंद्र आहेर यांच्या घुंगरू सुटलं र कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

दि. 19 फेब्रुवारी 2023 शिवजयंतीदिनी परशुराम नाट्यगृह शालिमार येथे माननीय शाहीर सुरेशचंद्र आहेर...

read more
बघा व्हिडिओ-श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सभा मंडपाचे  आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन

बघा व्हिडिओ-श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सभा मंडपाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन

  नांदगाव शहरातील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरासाठी आमदार सुहास अण्णा कांदे...

read more
.