loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – आय यू डी पी परिसरातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम

Oct 29, 2022

आय.यु.डि.पी. दर्शन फ्रेंड सर्कल मधील तरुणांनी उत्स्फूर्तपणे एक स्तुत्य ऊपक्रम राबविला. परिसरातील स्वच्छता करून अनेक स्वच्छतेचे, पर्यावरणाचे जनजागृतीपर संदेश देणारे फोमशीट बोर्ड तयार करून प्रत्येक घरांचे गेटवर लावण्यात आले. त्या बोर्डवर एक पाऊल स्वच्छतेकडे, कचरा घंटागाडीतच टाका, स्वच्छ शहर आनंदी शहर, पुढील पिढीसाठी चांगली देन, माझा परिसर स्वच्छ ठेवेन, स्वच्छ सुंदर परिसर आरोग्य नांदेल निरंतर, कचरा योग्य ठिकाणी ठेवा, पृथ्वी, पाणी, हवा ठेवा साफ नाहीतर पुढली पिढी नाही करणार माफ, असा संदेश देण्यात आला. प्रत्येक घराजवळ एक कुंडीमध्ये झाड लाऊन ते कुंडीतील झाडाची जोपासायला परिसरातील नागरिकांना दत्तक म्हणून देण्यात आले. या ऊपक्रमाचे कौतुक परिसरातील श्री. महाले परिवार, शिंपी परिवार, चव्हाण परिवार, साखरे परिवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष सचिन शिरुड या नागरिकांनी केले असून दर्शन फ्रेंड सर्कलच्या तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत. दर्शन फ्रेंड सर्कलचे सार्थक महाले, विशाल शिंपी, आकाश घुगे, अनिकेत चव्हाण, अक्षय सोनार, विकी आहिरे, मोहित घुगे, विपीन महाले, विनीत महाले, सिद्धेश महाले, दानिश कुरेशी या युवकांनी हा स्तुत्य ऊपक्रम राबविला.

अजून बातम्या वाचा..

चांदवड तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायतीच्या 26 वर्षीय तरूण थेट सरपंच पदी विराजमान

चांदवड तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायतीच्या 26 वर्षीय तरूण थेट सरपंच पदी विराजमान

गोरक्षनाथ लाड दरेगांव - चांदवड तालुक्यातील चार दिवसापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले....

read more
पुन्हा कोरोनाचा धोखा :आरोग्य यंत्रणांनी अलर्ट राहावे – पंतप्रधान मोदींच्या सूचना

पुन्हा कोरोनाचा धोखा :आरोग्य यंत्रणांनी अलर्ट राहावे – पंतप्रधान मोदींच्या सूचना

मास्कसह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले...

read more
बघा व्हिडिओ – मनमाड येथील बेथेल चर्चच्या माध्यमातून आमदार संपर्क कार्यालयात कॅरल सिंगिंग उपक्रम संपन्न

बघा व्हिडिओ – मनमाड येथील बेथेल चर्चच्या माध्यमातून आमदार संपर्क कार्यालयात कॅरल सिंगिंग उपक्रम संपन्न

मनमाड शहरामध्ये ख्रिस्ती समाजाची मोठी संख्या आहे, ख्रिस्ती समाज बांधव सध्या नाताळ सप्ताह साजरा करत...

read more
आदिवासी व्यवहार मंत्रालयासाठी 2014-15 मध्ये असलेली तरतूद 3832 कोटी रूपयांवरून वाढवून 2022-23 मध्ये केली 8407 कोटी रूपये- भारती पवार

आदिवासी व्यवहार मंत्रालयासाठी 2014-15 मध्ये असलेली तरतूद 3832 कोटी रूपयांवरून वाढवून 2022-23 मध्ये केली 8407 कोटी रूपये- भारती पवार

श्येड्युल्ड ट्राइब कंपोनंट- एसटीसी निधीचे वाटप 2014-15 मध्ये 19,437 कोटी रुपयांवरून वाढवून 2022-23...

read more
“निर्लज्जपणा” शब्द वापरणे भोवले – राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत  निलंबित

“निर्लज्जपणा” शब्द वापरणे भोवले – राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

सध्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत...

read more
युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरेशजी शेलार व मांगीलाल चव्हाण* (देवघट) यांची संजय गांधी  निराधार समिती मालेगाव च्या सदस्य पदी निवड

युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरेशजी शेलार व मांगीलाल चव्हाण* (देवघट) यांची संजय गांधी निराधार समिती मालेगाव च्या सदस्य पदी निवड

युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरेशजी शेलार व मांगीलाल चव्हाण* (देवघट) यांची *संजय गांधी निराधार समिती...

read more
.