loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – आय यू डी पी परिसरातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम

Oct 29, 2022

आय.यु.डि.पी. दर्शन फ्रेंड सर्कल मधील तरुणांनी उत्स्फूर्तपणे एक स्तुत्य ऊपक्रम राबविला. परिसरातील स्वच्छता करून अनेक स्वच्छतेचे, पर्यावरणाचे जनजागृतीपर संदेश देणारे फोमशीट बोर्ड तयार करून प्रत्येक घरांचे गेटवर लावण्यात आले. त्या बोर्डवर एक पाऊल स्वच्छतेकडे, कचरा घंटागाडीतच टाका, स्वच्छ शहर आनंदी शहर, पुढील पिढीसाठी चांगली देन, माझा परिसर स्वच्छ ठेवेन, स्वच्छ सुंदर परिसर आरोग्य नांदेल निरंतर, कचरा योग्य ठिकाणी ठेवा, पृथ्वी, पाणी, हवा ठेवा साफ नाहीतर पुढली पिढी नाही करणार माफ, असा संदेश देण्यात आला. प्रत्येक घराजवळ एक कुंडीमध्ये झाड लाऊन ते कुंडीतील झाडाची जोपासायला परिसरातील नागरिकांना दत्तक म्हणून देण्यात आले. या ऊपक्रमाचे कौतुक परिसरातील श्री. महाले परिवार, शिंपी परिवार, चव्हाण परिवार, साखरे परिवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष सचिन शिरुड या नागरिकांनी केले असून दर्शन फ्रेंड सर्कलच्या तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत. दर्शन फ्रेंड सर्कलचे सार्थक महाले, विशाल शिंपी, आकाश घुगे, अनिकेत चव्हाण, अक्षय सोनार, विकी आहिरे, मोहित घुगे, विपीन महाले, विनीत महाले, सिद्धेश महाले, दानिश कुरेशी या युवकांनी हा स्तुत्य ऊपक्रम राबविला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक कचरा स्वच्छता मोहीम राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना यांचा अभिनव उपक्रम.

मनमाड महाविद्यालयातर्फे वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक कचरा स्वच्छता मोहीम राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना यांचा अभिनव उपक्रम.

 महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय...

read more
प्रभाग क्रमांक सात व नऊ येथील होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद

प्रभाग क्रमांक सात व नऊ येथील होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रमास उदंड प्रतिसाद

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह मनमाड शहरात सुरू...

read more
मनमाड रेल्वे कॉलनीत दररोज पाणीपुरवठा करण्याचे लाहोटी यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

मनमाड रेल्वे कॉलनीत दररोज पाणीपुरवठा करण्याचे लाहोटी यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

मनमाड रेल्वे कॉलनी मध्ये दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्यात येतील असे...

read more
.