loader image
[ays_poll id=7]

नांदगाव नगरपालिकेच्या भरारी पथकाने शहरात सिंगल युज प्लास्टिक विक्रेत्याकडून ५००० रूपये दंड वसूल

Nov 2, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे
याबाबत अधिक वृत असे की देशात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवर एक जुलै पासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्या अनुषंगाने नांदगाव नगरपरिषदेच्या पथकाने बुधवारी ( दि.२) रोजी शहरातील मुख्य बाजारपेठेत प्लास्टीक विक्री करणा-या विक्रेत्यास ५०००/- (पाच हजार रुपये दंड केला आहे व अंदाजे ३ किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.

सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे, प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो. त्या वस्तूंचा एकदा वापर केल्यानंतर फेकून द्यायच्या असतात. जर या वस्तूंचा वापर सातत्यानं केला, तर मात्र त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. तसेच, यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचण्याचा धोका संभवतो जर कोणी एकेरी प्लास्टिकचा वापर करताना आढळलं तर, त्यांना शिक्षा केली जाईल, असं पर्यावरण मंत्रालयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. कोणी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करत असेल, तर तुरुंगवास आणि दंड या दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा (EPA) कलम 15 अंतर्गत एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वापरावर कारवाई केली जाईल, असंही या कायद्यात म्हटले आहे.
सदरील कारवाई मुख्याधिकारी विवेक धांडे यांचे मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक राहुल कुटे, विजय कायस्थ, रामकृष्ण चोपडे, निलेश देवकर, सुनिल पवार, अंबादास सानप, विजया धनवट यांचे पथकाने केली आहे. यापुढे देखील नांदगाव शहरात प्लास्टीक बंदीची कारवाई मोठया प्रमाणात सुरू राहणार असुन नागरीकानी प्लास्टिकची विक्री व वापर टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.