loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ४ नोव्हेंबर २०२२ – शुकवार

Nov 4, 2022


मेष – आज सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट व मित्रांसह वेळ खूप आनंदात जाईल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. त्यांच्याकडून लाभ होईल. निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल. सरकारी व निम-सरकारी कामात यश मिळेल.

वृषभ – आजचा दिवस नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नोकरी – व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नती होईल. व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील.

मिथुन – मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था व कटकटीचा राहील. शरीराने थकाल व आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील. सहकारी सहकार्य करणार नाहीत.

कर्क – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारां बरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. सरकारी कामात विघ्ने येतील.

सिंह – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नोकरी – व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती उत्तम राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनात काळजी राहील. सामाजिक जीवनात यश मिळेल.

कन्या – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात सुख शांतीचे वातावरण राहिल्यामुळे मन ही प्रसन्न राहील. काही सुखद प्रसंग घडतील. प्रकृती उत्तम राहील. रुग्णांची तब्बेत सुधारेल. आर्थिक लाभ होतील तसेच यशही मिळेल.

तूळ – आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल. बौद्धिक कामे व चर्चेत दिवस घालवू शकाल. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण करू शकाल. संतती कडून काही चांगली बातमी मिळेल. आपली प्रगती होईल.

वृश्चिक – आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील.

धनु – आज एखाद्या गूढ व रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण होईल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. जवळचा प्रवास घडेल.

मकर – आज ‘मौनं सर्वार्थ साधनं’ ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत म्हणून ह्याची आवश्यकता आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील.

कुंभ – आजचा दिवस शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल.

मीन – आज कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा व पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयां पासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. परोपकारी कार्यावर खर्च होईल.


अजून बातम्या वाचा..

.