शीख धर्माचे पहिले गुरु गुरुनानक देवजी यांच्या ५५३ व्या जयंती निमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मनमाड येथील गुरुद्वारा येथे भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कोरोना व महापुरात गुरुद्वारा तर्फे देण्यात आलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी एक प्रतिमा यावेळी मनमाड गुरुद्वारा गुपतसर साहेबचे संत बाबा रणजितसिंग यांना राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहराच्या वतीने भेट देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड, सेवादलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, अमोल गांगुर्डे, मनोज परदेशी, श्रीराज कातकाडे, अक्षय देशमुख, अमोल काळे, संदीप जगताप, प्रतिक मोरे, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.

फलक रेखाटन 1 मे 2025 महाराष्ट्र दिन व कामगार दिन
1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1 मे...