loader image

खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

Nov 11, 2022


येवला (प्रतिनिधी)
विविध प्रकारच्या खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान हिण्यासाठी विवेकी विचार वर्तनाची जोड द्यावी त्यातूनच उद्याचे सक्षम राष्ट्र उभे राहिले असे प्रतिपादन महाराष्ट्र राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे यांनी केले. येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

क्रीडा व युवकसेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक आयोजित येवला तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चे उदघाटन महाराष्ट्र राष्ट्र सेवादलाचे कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन कोकाटे व येवला तालुका पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. दिनांक १० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२२ रोजी विविध शालेय क्रीडा स्पर्धा होत असून आज पारेगाव येथील आर्य निकेतन स्कुल ता.येवला येथे शानदार उदघाटन संपन्न झाले.येवला तालुका क्रीडाधिकारी महेश पाटील,सरपंच सचिन आहेर,उपसरपंच नंदू जाधव,आर्यनिकेतन स्कुलचे अध्यक्ष खुशाल गायकवाड,बाबासाहेब खिल्लारे,उद्योजक बाबासाहेब खिल्लारे इ.मान्यवर उपस्थित होते.

येवला तालुका क्रीडा स्पर्धेचे उदघाटन योगासने स्पर्धेने करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक येवला तालुका क्रीडा संयोजक नवनाथ उंडे यांनी केले.ह्या वेळी दि.१ डिसेंबर २०२२पर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत योगासन,कराटे,क्रिकेट,हॉलीबॉल,फुटबॉल,कुस्ती,कबड्डी, खो-खो,अथेलेटिक,बुद्धिबळ इत्यादी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असिफ पठाण तर आभार ऋषीकेश गायकवाड यांनी मानले.स्पर्धेचे पंच म्हणून प्रवीण घोगरे,ऋषीकेश गायकवाड,शैलेश घाडगे,जय मुटेकर,धर्मराज शिरसाठ यांनी काम पाहिले. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी प्रवीण घोगरे,कृषिकेश गायकवाड, सचिन आहिरे, श्रीकांत वाघचौरे,अजय पारखे,अमोल गायकवाड, सचिन पाडांगळे,दौलत वाणी, जडगुलेसर,जाधव सर,सागर लोणारी,सागर मुटेकर,शैलेश गायकवाड, शैलेश घाडगे,प्रा.शिंदे,शिवाजी साताळकर,अमोल राजगुरू आदी परिश्रम घेत आहेत. पुढील स्पर्धा नियोजन व सहभागा करता अधिक माहिती करता (उंडे सर) ९४२३०३९५१० ह्या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख शरद शेजवळ यांनी दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

.