loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल विजयी.

Nov 16, 2022


मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१७ वर्षाआतील, मुले) फुटबॉल स्पर्धेत विजय संपादन केला.
दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी मनमाड येथील सेटं झेवियर हायस्कुल येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नांदगाव तालूक्यातील शेहजादे इंग्लिश स्कूल, गुरु गोविंदसिंग हायस्कुल, केन्द्रीय विद्यालय मनमाड, एच.ए.के. हायस्कुल, सेटं झेवियर हायस्कुल, मनमाड व गुड शेफर्ड स्कुल, मनमाड या शाळेतील विद्यार्थी फुटबॉल स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम सामना केन्द्रीय विद्यालय, मनमाड व गुड शेफर्ड स्कूल, मनमाड यांच्यामध्ये झाला व अंतिम सामन्यात गुड शेफर्ड स्कूल च्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सामना जिंकला. संघाला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री. व्यंकटेश देशपांडे सर व श्री. रिसम परविंदर (लकी सर) यांनी केले.
गुड शेफर्ड स्कूलचे प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.