loader image
[ays_poll id=7]

अध्यापकभारतीच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचारी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Nov 16, 2022


येवला (प्रतिनिधी) : शाळा-महाविद्यालये तथा शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाच्या मौल्यवान कार्य प्रक्रियेत प्रशासनाचा अविभाज्य भाग असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींचा शाळा-महाविद्यालयातील व्यवस्थापन कार्यात बहुमोल योगदान असून शिक्षकेत्तरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रबळ संघटन असण्याची गरज असल्याचे मत येथे आयोजित शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार समारंभात मान्यवरांनी व्यक्त केले.
अध्यापकभारतीच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचारी दिनाचे औचित्य साधून येवला तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा अध्यापकभारती ह्या राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने सत्कार संपन्न झाला.
शिक्षकेत्तर कर्मचारी देत असलेली सेवा हि बहुमोलची असून त्यांच्या ऋणातून समाजाला उतराई होता येणार नसल्याचे प्रतिपादन ह्या वेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्यवस्थापक सुरेश खळे यांनी केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब गोरे हे होते.संजय जाधव सर (गवंडगांव),गोरे सर कुसुर,गायकवाड सर धामोडे,राजेंद्र दराडे,गोरख खराटे,लक्ष्मण दाणे,बी.डी.खैरनार,संजय फरताळे,विश्वास जाधव,आनंदा जाधव,आब्रार सर,वसंत पवार,रावसाहेब खराटे,शैलेश आहिरे,नाना काळे आदी शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेंद्र वाघ तर सूत्रसंचालन शरद शेजवळ यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.