loader image
[ays_poll id=7]

बेजगाव येथे तरसाच्या हल्ल्यात जगन लहाने जखमी – ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

Nov 18, 2022

शहरालगत असलेल्या बेजगाव गावामध्ये शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर तरस प्राण्याने हल्ला केल्याची घटना काल सकाळी घडली. या हल्ल्यात जगन शिवाजी लहाने जखमी झाले असून त्यांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे बेजगाव परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबटे, वाघ यांनी हल्ले केल्याचे ऐकिवात आहे मात्र सहसा नजरेलाही न दिसणारे तरस हल्ला करतील अशी शंकाही येणार नाही मात्र ही गोष्ट खरी असून मनमाड पासून जवळ असलेल्या बेजगाव गावांमध्ये सध्या तरस नावाची चांगलीच दहशत पसरली आहे. गेल्या काही महिन्यापासून हल्ल्याचे प्रकार घडत असून मागे तीन जण गंभीर जखमी झाले होते.

आज जगन शिवाजी लहाने हे पहाटे आपल्या शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी जात असतांना झाडाझुडुपांमध्ये लपून बसलेल्या तरसाने त्यांच्यावर हल्ला केला तरसाने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या पाय पकडला तर छातीला मुका मार लागला आहे. हल्ल्यात लहाने हे गांगरून गेले होते. त्यानंतर त्यांनी जोरजोरात आरडाओरड केल्यामुळे तरस पसार झाला होता जखमीला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या घटनेमुळे बेजगाव परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. हा तरस इतरही व्यक्तींवर हल्ला करू शकतो यासाठी वन विभागाने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.