loader image
[ays_poll id=7]

लोककलावंतांचे विविध रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कला बैठक हुतात्मा स्मारक नाशिक येथे संपन्

Nov 21, 2022


नाशिक (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील तमाम शोषित, उपेक्षित व वंचित लोककलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी,त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी,शासन दरबारी त्यांचे प्रश्न खंबीरपणे मांडण्यासाठी, “महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान” या संस्थेची स्थापना दिवंगत संस्थापक अध्यक्ष,हिरामण जाधव यांनी १९९५ मध्ये केली होती.सांस्कृतिक कला अभियान चळवळीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून लोक कलावंतांचे विविध प्रश्न शासन दरबारी वेळोवेळी मांडून,हिरामण जाधव यांनी लोककलावंतांना न्याय मिळवून दिला व त्यांच्या अनेक मागण्या यशस्वीपणे सोडविल्या. प्रारंभी संस्थापक दिवंगत हिरामण जाधव,दिवंगत उपाध्यक्ष विनायक पाठारे व इतर दिवंगत कलावंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रविवार दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोजी,हुतात्मा स्मारक नाशिक येथे, महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानची वार्षिक बैठक उत्साहात संपन्न झाली.
त्यात राज्यकार्यकारिणीची निवड करण्यात आली.तसेच बीड,नाशिक,
जालना,नगर व इतर जिल्ह्याची कार्यक्षम कार्यकारिणी लवकरच गठित करण्यात येणार असून त्यानंतर लोककलावंतांचे प्रलंबित प्रश्न व उचित मागण्या शासन दरबारी मांडून,
वेळप्रसंगी लढा उभारून कलावंतांना न्याय मिळवुन देण्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष शाहीर सुरेशचंद्र आहेर व सरचिटणीस अशोक भालेराव यांनी दिली.
ह्या बैठकीत अनेक लोककलावंतांनी चर्चेत सहभाग घेऊन आपापली मते मांडली त्यानंतर खालील ठराव संमत करण्यात आले
.१) वृध्द कलावंत मानधन प्रस्ताव साठी उत्पन्न मर्यादा रू.४८०००/- वरून रू.दीड लाख करण्यात यावे.
२)कलावंतांतील आर्थिक विषमता व भेदभाव नष्ट करण्यासाठी वर्गवारी
(उदा. अ- वर्ग,ब- वर्ग व क वर्ग) पद्धत बंद करण्यात येऊन संविधानाचे समानतेचे तत्त्व पाळण्यात यावे.
३)दिवंगत मानधन प्राप्त मान्यवर वृध्द कलावंताच्या पत्नीस वा वारसदार पत्नीस,प्रतिज्ञापत्र व मोजके कागदपत्रे घेऊन जास्तीत जास्त दोन महिन्याच्या आत मानधन चालू करावे.
४) लोककलावंतां साठी झटणाऱ्या नोंदणीकृत सांस्कृतिक संस्थेचे दोन प्रतिनिधी, जिल्हा परिषदेच्या”मान्यवर वृध्द कलावंत मानधन निवड समिती” वर,अशासकीय सदस्य म्हणून घेण्यात यावेत.
५) मानधन प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तो मंजूर झाला की नामंजूर हे तीन ते सहा महिन्याच्या आत कारणासह कलावंताला लेखी कळविणेत यावे. त्याचप्रमाणे प्रलंबित मानधन प्रस्ताव,खोटे कलावंत छाननी,इतर जिल्हा कार्य संघटन व नाशिक जिल्हा कार्यकारिणी गठण,सभासद नोंदणी,
आर्थिक संकलन व लोककलावंतांचे प्रश्न व समस्या,शासकीय मदत व योजना यावर सविस्तर व अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीस राज्य पदाधिकाऱ्यांसह अहमदनगर,जालना,बीड,नाशिक जिल्हा व विविध तालुक्यातील सुमारे निवडक बावन्न लोककलावंतांनी हजेरी लावली.
नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ.भरत कारिया,ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून संपत खैरे यांची निवड करण्यात आली प्रास्ताविक अनिल मनोहर यांनी केले तर सूत्रसंचालन अशोक भालेराव यांनी केले.आभार मनोहर नेटावटे यांनी मानले.

राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली अध्यक्ष… शा. सुरेशचंद्र आहेर सरचिटणीस..अशोक भालेराव राज्य उपाध्यक्ष राम घोडके (जालना) व राजेंद्र जव्हेरी(नाशिक) राज्य कार्याध्यक्ष.मल्हारी खेडकर(बीड) सहचिटणीस..रखामाजी सुपारे, भाऊसाहेब चव्हाण कोषाध्यक्ष अनिल मनोहर(ना.रोड) कार्यकारिणी सदस्य

१)अशोक बागुल (वैजापूर)

२)भानुदास बैरागी(कोपरगाव)

३)गीता गायकवाड (नाशिक)

४)प्रा.शरद शेजवळ (पिंपळगांव ब.)

५)प्रसिध्दी प्रमुख…अमोल घोडके

 


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.