loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २२ नोव्हेंबर २०२२ – मंगळवार

Nov 22, 2022


मेष : आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल.

वृषभ : व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील.

मिथुन : आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळे स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्याने डोके शांत ठेवा. मानहानी संभवते.

कर्क : आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल.

सिंह : आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील.

कन्या : आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संतती विषयी चिंता लागून राहील.

तूळ : आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील.

वृश्चिक : आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल.

धनु : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका.

मकर : आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील.

कुंभ : आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शक्यतो कोर्ट – कचेरी पासून दूर राहा. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा.

मीन : आज अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.