loader image
[ays_poll id=7]

नव्याने होणार महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना – नगरविकास विभागाचे आदेश

Nov 23, 2022


मुंबईसह राज्यातील २४ महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने काल जारी केले आहेत. नवी मुंबई, मुंबई आदी महापालिकांची मुदत संपली आहे. तर काही महापालिकांची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे, अशा सर्व महापालिकांनी निवडणुकीसाठी प्रभाग संख्या / रचना निश्चित करावेत, असे आदेश नगरविकास खात्याचे आहेत. त्यामुळे लवकरच सर्व महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येतील, असे संकेत यातून मिळत आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्या वाढीच्या आधारावर सरासरी प्रभाग/ वॉर्ड संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईसह राज्यातील बहुतेक सर्व महापालिकांत ९ नगरसेवकांची वाढ झाली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारचा निर्णय नव्या सरकारने बदलला होता. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. येत्या २८ नोव्हेंबर रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.
मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांच्या निवडणुका कधी होणार याचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. तर दुसरीकडे, राजकीय नेतेही राज्यातील भाजप व शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल व मध्यावधी निवडणुका लागतील, अशी भाकिते करीत आहेत. अशातच मंगळवारी नगरविकास खात्याच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी – छापवाले यांनी सर्व महापालिका आयुक्तांसाठी तातडीने एक पत्रक जारी केले असून त्यामध्ये महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जनगणनेनुसार प्रभागांची संख्या/ रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे आदेश दिले आहेत.

मुंबई महापालिका अधिनियम 1888 व महानगरपालिका अधिनियम 1949मध्ये संदर्भीय केलेल्या तरतूदीप्रमाणे मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महापालिकांची आगामी निवडणूक घेण्यासाठी प्रभागांची संख्या/ रचना निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, सचिव, राज्य निवडणूक आयोग, नगरविकास खात्याचे संबंधित सहसचिव आणि उपसचिव यांनाही या पत्रकाची प्रत पाठवून तुमच्या अखत्यारीत महापालिकांची निवडणुकीसाठी आवश्यक प्रभाग संख्या व रचना निश्चित करण्यासाठी आपण जातीने पाठपुरावा करावा, असे म्हटले आहे.

या 24 महापालिकांच्या प्रभागांची पुनर्रचना
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, संभाजीनगर नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा – भाईंदर या 23 महापालिकांची मुदत संपली आहे. तेथे सध्या प्रशासक कारभार पाहत आहेत. तर नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी महापालिकेची प्रथमच निवडणूक होईल. त्यामुळे सध्या राज्यातील २८ पैकी २४ महापालिकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात येईल.


अजून बातम्या वाचा..

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

  कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत वरिष्ठ महिलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार...

read more
.