loader image
[ays_poll id=7]

नायलॉन मांजा व सिंगल युज प्लास्टीक विक्रेत्यांवर मनमाड नगर परिषदेची धडक कारवाई

Nov 23, 2022

बुधवार दि. 23/11/2022 रोजी मनमाड नगर परिषदेचे मा. डॉ. सविनकुमार पटेल मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार मनमाड शहरातील मराठी शाळा क्र. 8 च्या मागे, मुक्तांगण परिसर, सराफ बाजार, डेली भाजी मार्केट परिसर, म. फुले पुतळा सिंगल युज प्लास्टीक बंदीसाठी तीस आस्थापनांची पाहणी केली असता अंदाजे पंधरा किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले. त्याच बरोबर चायनिज नायलॉन मांजा जप्त करून 5000/- रुपये दंड

आकारण्यात आला सदर कारवाई करतांना न. पा. चे स्वच्छता निरिक्षक श्री. विजय सोनवणे, सुरज चावरिया, संतोष वानखेडे, सतिष चावरिया, व आरोग्य विभागातील कर्मचारी बापू सकट, संजय छजलाना, रविंद्र सायबू, वाल्मीक झाल्टे, करण चावरिया, राकेश चावरिया, दिगंबर-हतांगळे, अमोल बहोत, संजय देठे इ० कर्मचारी कारवाईस उपस्थीत होते.

तरी मनमाड शहरातील सर्व नागरिकांनी सिंगल युग प्लास्टीकचा वापर करू नये व पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच सद्या येणा-या सणासुदी मुळे लहान मुले व सणांमध्ये पतंग खेळण्याचे आकर्षण आहे.

तरी सर्वांनी सुरक्षीत काळजी घ्यावी, जेणे करून नायलॉन मांजा वापरू नये आपल्या स्वत:ला व इतरांनाही पतंग खेळतांना कुठल्या ही स्वरुपात इजा होऊ नये याची दक्षता घेवूनच पतंग खेळाचा आनंद घ्यावा असे आवाहन मनमाड नगर पालीकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. डॉ. सचिन कुमार पटेल यांनी केलेले आहे.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.