loader image
[ays_poll id=7]

गोवर आजार – प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात – शिवसेना रुग्ण कल्याण समितीची मागणी

Nov 25, 2022


शिवसेना रुग्ण कल्याण समितीतर्फे गोवर आजारावर प्रतिबंधात्मक कारवाई होण्याबाबत वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांना निवेदन देण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथील वैद्यकीय अधिक्षकांना सध्या राज्यभरात गोवर आजाराच्या साथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी म्हणून गुरुवारी निवेदन देण्यात आले.
सध्या राज्यामध्ये गोवर आजाराने थैमान घातले असून हा आजार आता आपल्या जिल्ह्यासह ग्रामीण भागात वेगाने पसरत असून मनमाड शहरातील नागरीक कामधंद्यासाठी नाशिक, मालेगाव, जळगाव आदी शहरामध्ये ये-जा करीत असतात. त्यादृष्टीने शहरात हा रोग- येण्यास काहीही वेळ लागणार नसून या पार्श्वभुमीवर आपल्या रुग्णालयाने सतर्क होऊन आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन शहरातील आणि ग्रामीण भागातील जनतेस या रोगापासून लाबं ठेवता येईल,
त्याचप्रमाणे आपल्या रुग्णालयामध्ये स्वतंत्र संसर्गजन्य आजार प्रतिबंधात्मक कक्ष कार्यान्वीत करावे व उपाययोजना करावी.
अशी मागणी रुग्णकल्याण समितीच्या वतीने करण्यात आली.
या वेळी शिवसेना मनमाड शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे रुग्ण कल्याण समिती सदस्य दिनेश घुगे व महेंद्र गरूड उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.