loader image
[ays_poll id=7]

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा,अचूक रीडिंग व वीज बिलाची नियमित वसुली आवश्यकच; सिएमडी विजय सिंघल

Nov 26, 2022

नागपूर, दि. २६ नोव्हेंबर २०२२: महावितरणच्या वीज ग्राहकांना ग्राहकांना सर्वोत्तम सेवा,विजेच्या वापराप्रमाणेच अचूक बिल व ग्राहकांनी वापरलेल्या वीज बिलाची नियमित वसुली आवश्यकच असून संबंधित अधिकाऱ्यांनी यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करावी असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी शुक्रवारी (दि. २५) रोजी नागपूर प्रादेशिक विभागातील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
ऊर्जाक्षेत्रात पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. आता वीज खरेदीचे पैसे नियमीत द्यावेच लागतात. ते न दिल्यास महावितरणला मिळणाऱ्या विजेत कपात केली जाऊ शकते. त्यामुळे महावितरणला वीज निर्मिती कंपन्यांना वीज खरेदीचे पैसे तातडीने व नियमित देणे गरजेचे असते. महावितरणला मिळणाऱ्या कर्जावरही मर्यादा आली आहे. ही सर्व वस्तुस्थिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच या वस्तुस्थितीची जाणीव ग्राहकांनाही करून देणे तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहकांशी सातत्याने संवाद साधा असे निर्देश विजय सिंघल यांनी बैठकीत दिले.
ग्राहकांना नियमित वीजबिल भरण्याची सवय लावण्याची गरज आहे. ग्राहक मोबाईल,केबल टीव्ही सारख्या इतर कंपन्यांचे बिल भरणे टाळत नाही.महावितरणचे वीज बिल भरणे मात्र टाळतात.अशा ग्राहकांकडे महावितरणच्या वीज बिलाची अजिबात थकबाकी राहणार नाही यासाठी नियमितपणे वसुली मोहीम राबवा,वीजचोरी विरुद्ध कठोरपणे कारवाई करा असेही निर्देश त्यांनी या आढावा बैठकीत दिले.
या बैठकीमध्ये नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंते सर्वश्री सुनील देशपांडे (चंद्रपूर), दिलीप दोडके (नागपूर),अनिल डोये (अकोला), पुष्पा चव्हाण (अमरावती), राजेश नाईक (गोंदिया), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार तसेच अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.