Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे चार पेपर पुढे ढकलले

Nov 29, 2022

PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून चार मुख्य परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे, असे एमपीएससीने जाहीर केले आहे.

२४ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ हा पुढे ढकलण्यात आला आहे. सोबतच ३१ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा, ७ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २, राज्य कर निरीक्षक पदाची परीक्षा आणि १४ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील एक प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील आयोगाने म्हटले आहे.

अजून बातम्या वाचा..

कर्डकांनी आपल्या साहित्य साहिरीतून संविधानिक विचार मूल्य लोकमाणसात रुजवले : डॉ.उत्तम अंभोरे

येवला (प्रतिनिधी) : माणसाच्या विचार प्रक्रियेत होणाऱ्या बदलाचा परिवर्तनाचा विचार संविधानात केला...

read more

मनमाड़ सार्वजनिक वाचनालय तर्फे वाचक प्रेरणा दिनानिमित्ताने 433 पुस्तकांची ग्रंथ संपदा वाचकांसाठी खुली !

मनमाड शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व साहित्य परंपरेमध्ये मानाचे,गौरवाचे स्थान...

read more

मनमाड वर्कशॉप मधील एल.एस.सेक्सन तर्फे दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खिरदान..

मनमाड वर्कशॉप मधील एल.एस. सेक्सन तर्फे दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ने खिरदान करण्यात आली....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]