loader image

लहानमुलां मधील अपंगत्व निर्मूलन हि काळाची गरज – डॉ.निखिल चल्लावार

Dec 2, 2022


जागतिक दिव्यांग दिवसनिमित्त विशेष लेख : लहान मुलांमधील जन्मजात अस्थिव्यंगाचे आजार आणि त्यावरील उपचार
नाशिक: प्रतिनिधी – 3 डिसेंबर हा दिवस जागतिक (अपंग) दिव्यांग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिवशी समाजात दिव्यांगाबाबत समाजात जनजागृती होण्यासाठी, दिव्यांगांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल. तसेच त्यांच्याबाबत समाजात आदर,सहानुभूती,सन्मान निर्माण होईल, त्यांच्या अडचणी समजतील आणि त्यांच्या अडचणीवर सहजतेने मात करता येईल. यासाठी जागतिक दिव्यांग दिन सर्वत्र जगभर साजरा केला जातो.
डॉ निखिल चल्लावार हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव लहान मुलाचे ‘अस्थीरोग शस्त्रक्रिया तज्ञ्’ आहेत, आणि गेली नऊ वर्षांपासून डॉ चल्लावार हे नाशिक मध्ये अपंग मुलांची देखभाल व त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करत आहेत. त्यांना या सामाजिक कार्यासाठी अत्यधुनिक उपकरणे व साधने प्राप्त व्हावीत यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ने हि, सामाजिक जवाबदारी स्वीकारली, जे उपचार यापूर्वी फक्त मोठ्या महानगरामध्ये आणि परदेशात उपलब्ध होती, याची उणीव नाशिक शहरात कायम जाणवत होती म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ने लहानमुलांमधील अपंगत्व निर्मूलनाचा ध्यास मनाशी घेतला. विशेष सांगाव्याचे झाल्यास, हि सेवा समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचेल आणि सामान्य जनतेला परवडेल याची विशेष काळजी घेतली आहे. त्याच प्रमाणे ‘आरोग्य मित्र विभाग ‘ रुग्णालयात सुरु केला आहे. जेणेकरून आर्थिक बाजू कमकुवत असणाऱ्या कुटुंबासाठी हा विभाग देशभरातून अनेक सामाजिक संस्थे सोबत समन्वय साधून लहान मुलांसाठी शस्त्रक्रियेसाठी निधी उभारण्यासाठी मदत करतो. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णावर उपचार घेणे सोपे जाते. हि सेवा सुरु झाल्याने उत्तर महाराष्टातील गरजू रुग्णांना मुंबई पुणे महानगराची धावपळ यामुळे टळत आहे.
डॉ निखिल चल्लावार म्हणतात, समृद्ध आयुष्य आणि धष्टपुष्ट शरीर हि देवाची देणगी आहे असं आपण ग्राहय धरून चालतो. पण याची खरी किंमत हि एका अपंग व्यक्तीला माहिती असते त्याला हि देणगी लाभलेली नसते. जन्मजात अस्थिव्यंगाचे आजार हे समाजामध्ये आज पर्यन्त देवाचा प्रकोप मानला जाई, परंतु आधुनिक विज्ञानाने नवीन तंत्राच्या साहाय्याने या अपंगावर यशस्वी रितिने मात केली आहे, लहान मुलांमधील या व्याधी निवारण होण्यासाठी देशभरातील सामाजिक संस्था या पुढे सरसावलेल्या आहेत असामान्य परिस्थिती मध्ये आर्थिक कारणाने बहुतांश लहान मुलांवर उपचार होत नाहीत हाच दुवा घेऊन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल ने अशा लहान मुलांना शोधून त्यांच्यावर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया केल्या आहेत.
डॉ निखिल चल्लावार यांनी या लहान मुलांच्या अस्थिव्यंग मध्ये प्रामुख्याने क्लब फूट, सेरेब्रल पाल्सी , स्कोलियोसिस , या जन्मजात आजारावर योग्य उपचार त्यांनी केले आहेत. जन्मजात पाय वाकडे असणे म्हणजेच याला क्लब फूट असे देखील म्हणतात.वेळीच निदान झाल्यास सर्जरीच्या सहाय्याने हा जन्मदोष दूर करता येऊ शकतो. त्याच प्रमाणे सेरेब्रल पाल्सी हा सुद्धा जन्मजात आजारातील व्यंग आहे. या आजारात शरीराची हालचाल, संतुलन आणि स्नायूंच्या टोनवर परिणाम होतो. ‘सेरेब्रल’ म्हणजे मेंदूशी संबंधित विकार, आणि ‘पाल्सी’ म्हणजे कमकुवतपणा किंवा स्नायूंची समस्या. सेरेब्रल पाल्सी मेंदूच्या अशा भागात सुरू होते जिथून स्नायू हलविण्याची क्षमता नियंत्रित होते. मेंदूचा भाग पाहिजे तसा विकसित होत नाही किंवा जन्माच्या वेळी किंवा नंतर काही अडचणी आल्यास सेरेब्रल पाल्सीची समस्या उद्भवू शकते. काहीजणांना जन्मजात सेरेब्रल पाल्सी असते. तर काहींना जन्मानंतर हा त्रास सुरू होतो. हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी योग्य वेळी उपचार केल्यास निश्चितच चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे निराश न होता औषधोपचार, आहार व व्यायाम या गोष्टींमध्ये सातत्य ठेवल्यास आपण सेरेब्रल पाल्सिग्रस्त बाळाला चांगले आयुष्य नक्कीच देवू शकतो. या मुलांमध्ये आनंद, उत्साह, आत्मविश्वास भरण्याची गरज आहे. दैनंदिन जीवनात व्यायाम, पोषक आहाराचा समावेश करणेही तितकेच गरजेचे आहे.स्कोलियोसिस दुखापत, सेब्रल पाल्सी, किंवा इतर कारणांमुळे पाठीचा कणा वाकणे ही समस्या देखील जन्मजात अनेक लहानमुलांमध्ये असू शकते. या स्थितीला स्कोलियोसिस म्हणतात. या स्थितीत पाठीचा कणा एका बाजूला फिरतो आणि व्यक्ती एका बाजूला झुकलेली दिसते.अश्या विविध विकाराचे निदान व उपचार अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे केले जातात. गरजू आणि आर्थिक बाजू कमकुवत असणाऱ्या कुटुंबासाठी भारतातील अनेक सामाजिक संस्था या कार्यास हातभार लावतात.
लहान मुलामध्ये खालील लक्षणे आढळल्यास मुलांच्या पालकांनी त्वरित अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलशी संपर्क साधावा
१. जन्मापासून हात पाय आणि अंग विकृत असणे
२. हात अथवा पायात वाक असणे.
३. मुलांच्या हाताच्या,पायाच्या हालचाली सुरळीत होत नसल्यास
४. जन्मापासून हात किंवा पाय न हलवणे
५. १८ वर्ष वयोगटाखालील मुलांमध्ये फ्रॅक्चर असणे.
६. हाताची, पायाची लांबी एकसारखी नसणे
– ह्या गोष्टी निश्चित लक्षात ठेवा :
१. बाळाच्या आणि लहान मुलांच्या विकृतींवर उपचार आहेत.
२ विकृती घालवण्यासाठी बाहेरच्या शहरात अथवा देशात जाण्याची आवश्यकता नाही.
३ आता आपल्या शहरात उपचार उपलब्द्ध आहेत.
४ विकृती लक्षात आल्यावर त्वरित उपचार सुरु करावेत.
५ जेवढ्या लवकर उपचार होतील तेवढ्या लवकर अडचणी कमी होतात
सुधारित समाज किंवा देश आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा समाजातील एकही घटक स्वतःला हीनदीन समजता कामा नये. प्रत्येक अपंग मनुष्यात स्वाभिमान जागृत झाला पाहिजे आणि स्वकष्टाने त्यांनाही आयुष्य जगता आले पाहिजे.

डॉ निखिल चल्लावार
लहानमुलांचे अस्थिविकार व शस्त्रक्रिया तज्ञ
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , नाशिक


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.