Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

के.आर.टी शाळेचे सार्थक वाढवणे आणि स्मित मकवाने यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

Dec 2, 2022

मनमाड येथे झालेल्या तालुकास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत मनमाड येथील कवी रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १४ वर्षाखालील मुले व १७ वर्षाखालील मुलांच्या गटाने सहभाग घेतला.

या स्पर्धेत सार्थक सुनिल वाढवणे या विदयार्थ्यांने बुध्दिबळात ५ गुणांपैकी साडेचार गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला तर स्मित दिपक मकवाणे या विदयार्थ्यांने ५ पैकी ४ गुण प्राप्त करत चौथा क्रमांक मिळवला. वरील दोन्ही विदयार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली.

वरील विदयार्थ्याच्या या स्पृहणीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर, प्राथमिक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

वरील दोन्ही विदयार्थ्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. विशाल झाल्टे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

अजून बातम्या वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “भिमोत्सव 22″ला आज पासुन सुरवात

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित “भिमोत्सव 22″ला आज पासुन सुरवात

मनमाड : महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भिमोत्सव 22"ला...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले जयंती साजरी

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले जयंती साजरी

म. गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य...

read more
मनमाड महाविद्यालयात संगणक प्रशिक्षण कार्यशाळा व सोने विपणन क्षेत्रा संदर्भातील ग्राहकाची जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न

मनमाड महाविद्यालयात संगणक प्रशिक्षण कार्यशाळा व सोने विपणन क्षेत्रा संदर्भातील ग्राहकाची जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, येथे वाणिज्य विभागात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]