loader image
[ays_poll id=7]

अल्पवयीन मुलाच्या खुनाचा उलगडा अवघ्या दोन तासात – मनमाड पोलिसांची कामगिरी

Dec 2, 2022

मनमाड शहरातील नेहरु भवन जवळील आदिवासी वस्ती येथे राहणारा अल्पवयीन मुलगा वय ०९ वर्ष ०२ महिने हा दिनांक ३०-११-२०२२ रोजी सायंकाळी ०५-०० वाजता खेळण्यासाठी घरातुन बाहेर गेला होता. मात्र तो रात्री ०८-०० वाजेपावेतो घरी परत न आल्याने त्याचे आई, वडील, आजी यांनी मनमाड शहरात व त्यांचे नातेवाईक यांचेकडे सुमारे ०२ तास शोध घेतला मात्र तो मिळुन न आल्याने ते रात्री १०.०० वाजता पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन तत्परतेने मनमाड पोलीस स्टेशन येथे मुलाची आई सोनी सुनिल सोनवणे हिचे फिर्यादीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. व त्याचा शोध घेणेकामी मा. श्री समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड विभाग यांचे आदेशान्वये सपोनि श्री गिते यांनी तपास पथके तयार करुन अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेणेकामी शहरात रवाना केले. सपोनि श्री गिते व पोलीस स्टाफ यांनी रात्री ०१- ०० वाजेपावेतो अपहरण झालेला मुलगा लोकेश याचा कसोशिने शोध घेतला मात्र मुलगा मिळुन आला नाही.

दुसरे दिवशी दिनांक ०१-१२-२०२२ रोजी सकाळपासुनच पोलीसांचा घटनास्थळ परीसरात व मनमाड शहरातील सर्व ठिकाणांवर मुलाचा शोध घेणे सुरु होते. त्यादृष्टीने उपलब्ध सर्व सिसिटिव्ही तपासणी करीत असतांना अपहरण झालेल्या मुलाचे एका संशयीत इसमासोबतचे फुटेज मिळुन आले. त्यातच दुपारी ०४-०० वाजेचे सुमारास मनमाड रेल्वे स्टेशन जवळ पुणे रेल्वे लाईन लगत एका बालकाचा मृतहेद मिळुन आल्याची माहिती मिळुन आल्याने श्री समीरसिंग साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड विभाग, सपोनि श्री प्रल्हाद गिते व पोलीस स्टाफ यांनी लागलीच घटनास्थळी जावुन खात्री केली असता सदर मृतदेह हा अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाचा असल्याचे निष्पन्न झाले व तेथील परीस्थीती नुसार सदर बालकाचा खुन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तात्काळ श्री अनिकेत भारती, अपर पोलीस अधिक्षक, मालेगांव यांना कळविले असता ते घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे डॉग स्कॉड, फिंगरप्रिन्ट व फॉरेन्सिक एक्सपर्ट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मिळुन आलेल्या सिसिटिव्ही फुटेज मध्ये अपहरण झालेला अल्पवयीन मुलगा ज्या व्यक्तीसोबत जातांना दिसत होता त्याचा शोध घेणेकामी तात्काळ पथके तयार करुन रवाना करण्यात आले व सदर इसमास अवघ्या दोन तासात पकडुन त्यास ताब्यात घेण्यात आले. सदर इसमास विचारपुस केली असता त्याने त्याचे नांव सोन्या उर्फ राहुल उत्तम पवार वय १९ वर्ष राहणार नेहरूभवन आदिवासी वस्ती मनमाड असे असल्याचे सांगितले व तो अपहरण व मयत झालेला बालक लोकेश सोनवणे याचे घराजवळ राहात असल्याचे निष्पन्न झाले.

सदर युवकाकडे चौकशी केली असता सदर युवकाने त्याच्या लैंगिक भावना जागृत झाल्याने त्याने अनैसर्गिक संभोग करण्याचे उद्देशाने अल्पवयीन बालकाचे अपहरण करुन त्यास रेल्वे बंधारा येथे आंघोळ करण्याचे बहाण्याने घेवुन जावुन त्याचेसोबत दोन वेळा अनैसर्गिक संभोग केला. मात्र मुलगा रडुन लागल्याने व तो घरी जावुन घडलेला प्रकार सांगुन देईल या भितीने त्याने अल्पवयीन मुलाचे डोक्यात दगडाने मारुन व त्याचा उजवा हात हेक्सा ब्लेडने कापुन त्याचा निर्घृन खुन केला असल्याचे सांगितले. पोलीसांनी अवघ्या दोन तासात आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले असुन आरोपीने गुन्हयाची कबुली दिलेली आहे.

सदर गुन्याचा तपास मा. श्री शहाजी उमाप साहेब, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण, मा. श्री. अनिकेत भारती, अपर पोलीस अधिक्षक, मालेगांव, श्री समिरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड विभाग मनमाड, यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस स्टेशनचे सपोनि श्री पी गिते, पोउपनि श्री सरोवर, पोहवा सुनिल पवार, पोहवा संदिप वणवे, पोना गणेश नरोटे, पोना मुदस्सर शेख, पोशि गौरव गांगुर्डे, पोशि रणजित चव्हाण, पोशि राजेन्द्र खैरनार, पोशि संदिप झाल्टे, चालक मुरलीधर बुवा, चंदु मांजरे यांनी केला आहे.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी   रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.