loader image
[ays_poll id=7]

गुड शेफर्ड स्कूलमध्ये कायदेविषयक मोफत मार्गदर्शन व संविधान वाचन शिबीराचे आयोजन

Dec 2, 2022

मनमाड:- नांदगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व मनमाड संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सप्ताह चे आयोजन गुड शेफर्ड स्कूल मध्ये करण्यात आले होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संविधान वाचन व मोफत कायदे विषयक शिबिर दि. २ डिसेबंर २०२२ रोजी आयोजीत करण्यांत आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी संविधानाचे वाचन शाळेची विद्यार्थिनी संचिता पाटील ने केले. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून मनमाड न्यायालयाचे मुख्य नायाधीश मा. सौ. शलाका लोमटे, प्रशासन अधिकारी सौ. चंद्रमोरे मॅडम, मनमाड वकील संघाचे अध्यक्ष मा. सुधाकर मोरे, सरकारी वकील मा. गिरीश पवार, जेष्ठ वकील अॅड देसले, व अॅड अग्रवाल, प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, गुड शेफर्ड शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. देशभक्ति गीतांनी शिबीराचे वातावरण आंनदी व उल्हासित झाले. मनमाड न्यायालयाच्या न्यायधीश सौ. शलाका लोमटे यांनी भारतीय राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्व व आजच्या काळातील महत्व या विषयावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. सुधाकर मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू यांनी केले. सूत्रसंचलन गुड शेफर्ड शाळेचे शिक्षक भाऊसाहेब दाभाडे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.