loader image
[ays_poll id=7]

समृद्धी महामार्ग उद्घाटनाचा मुहूर्त ठरला – ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन

Dec 3, 2022


बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे. याचवेळी नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) व रिच-४ (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेदेखील उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची मागील अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा होती. त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग तयार असतानादेखील सुरू होत नसल्याने जनतेतूनच प्रश्न उपस्थित होत होते. जानेवारी महिन्यात पंतप्रधान इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या उद्घाटनासाठी नागपुरात येणार आहेत. तेव्हाच हे उद्घाटन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ११ डिसेंबरच्या तारखेला पंतप्रधानांकडून होकार देण्यात आला आहे.महा मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नागपुरला येण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ नागपूर आणि पुणे मेट्रो तेच नाशिक मेट्रो निओच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्याची दाट शक्यता आहे. उद्घाटनाअगोदर नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग पूर्णत: तयार होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष सह व्यवस्थापकीय संचालक (व्हीसीएमडी) राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले.
तीन आठवड्यात दोनदा नागपूर दौरा

समृद्धी व मेट्रोच्या उद्घाटनाच्या तारखेने अधिकाऱ्यांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ३ जानेवारीला नागपुरात येणार आहेत. त्यावेळी समृद्धी आणि नागपूर मेट्रो सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी तीन आठवड्याच्या कालावधीत दोनदा शहरात येण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पंतप्रधान नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या फुटाळा येथील म्युझिकल फाऊंटनचे लोकार्पण करणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांसाठी खुला करण्यापूर्वी ते आणखी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.