loader image
[ays_poll id=7]

जुळ्या बहिणींशी तरुणाने केलेले लग्न कायदेशीर कचाट्यात – महिला आयोगाने दिले चौकशीचे आदेश

Dec 5, 2022

सोलापूरच्या अकलूजमधील तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी केलेके लग्न सोशल मीडियावर चर्चेत असून आता हे लग्न कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चौकशीअंती कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत.

चाकणकरांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे की, “सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत.

“भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे. सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्तबाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 चे कलम 12 (1) व 12 (2) अन्वये तात्काळ सादर करावा.”

अजून बातम्या वाचा..

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

चांदवड येथील श्री आर पी चोरडिया मेडिकल कॉलेज येथे लायन्स क्लब मनमाड प्राईड व रोटरी आय हॉस्पिटल...

read more
.