loader image
[ays_poll id=7]

के आर डी हायस्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

Dec 6, 2022


के आर टी हायस्कूल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत विनम्र अभिवादन करण्यात आले. इयत्ता सातवी व इयत्ता दुसरी च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यावेळेस मुख्याध्यापक दीपक व्यवहारे,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी,विश्वस्त धनंजय निंभोरकर उपस्थित होते .इयत्ता दुसरीच्या अर्णव राजेश भावसार,सृष्टी राजेंद्र संसारे या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली .इयत्ता पहिली ची सायुरी संदीप केदारे या विद्यार्थिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मत मांडले. खुशी वाजे या विद्यार्थिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव सुहास जाधव या विद्यार्थ्यांने केले. या विद्यार्थ्यांना प्रवीण आहेर सर व सौ. ऋचा शिंपी या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.


अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.