loader image
[ays_poll id=7]

अविष्कार विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा २२-२३ साठी मनमाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

Dec 10, 2022


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढविण्या साठी संशोधन स्पर्धा राबवली जाते, या अंतर्गत दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते , स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड च्या संशोधक प्रकल्पाची विद्यापीठ स्तरावर स्तुत्य निवड झालेली आहे. प्युअर सायन्स विभागात प्रज्ञा विंचू, नेहा पठाडे, सुचिता बगदाने, वैष्णवी दराडे (पदव्युत्तर,रसायनशास्त्र विभाग ) यांच्या संशोधन प्रकल्पाची निवड झालेली आहे. विद्यापीठ स्तरीय निवड झालेल्या प्रकल्पांची पुढील स्पर्धा दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी जाधव क्रीडा संकुल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे होणार आहे या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील एआरसी समन्वयक प्रा. डॉ. जे डी वसईत, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्रा. रोहित शिंदे, डॉ. राहुल शिंदे, विभागप्रमुख डॉ. बी. एस. देसले, या सर्वाचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी, समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे, मा .शिक्षक आमदार संस्थेचे समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे, डॉ.अद्वय आबा हिरे-पाटील, विश्वस्त व जनसंपर्क प्रमुख मा.संपदादीदी हिरे, संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. हरीष आडके, सहसचिव डॉ.व्ही. एस. मोरे, महाविद्यालयीन विकास समितीचे संस्था प्रतिनिधि प्राचार्य. डॉ. बी .एस. जगदाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही पाटील, उपप्राचार्य डॉ. पी जी. आंबेकर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.